Arvind Kejriwal News : मुख्यमंत्री केजरीवालांसाठी जगभरात आज सामुहिक उपवास; कुणी घेतला पुढाकार?

Delhi Liquor Scam Case : अरविंद केजरीवाल यांना मध्य धोरण प्रकरणात ईडीने मागील महिन्यात अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आपकडून केला जात आहे.
AAP Protest
AAP ProtestSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal News) यांनी सक्तवसुली संचालनालयाने मागील महिन्यात अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. भाजप आणि ईडीकडून त्यांना अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. आपकडून त्यांच्या अटकेविरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे.

'आप'कडून (AAP) आज भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये सामुहिक उपवास (Upwaas for Kejriwal) केले जात आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या उपवासाला सुरूवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते सुरू राहील. दिल्लीसह (Delhi) देशातील अनेक शहरांमध्ये आपचे पदाधिकारी उपवास करत आहेत.

AAP Protest
Rahul Gandhi News : क्रिकेटमध्ये धोनी अन् भारतीय राजकारणात राहुल गांधी ‘बेस्ट फिनिशर’!

दिल्लीत जंतरमंतर येथे केजरीवाल सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांनी सामुहिक उपवासाला हजेरी लावली आहे. याविषयी बोलताना आपचे नेते म्हणाले, उपवासामुळे तुमचा आत्मा आणि मन शुध्द होते. केजरीवालांना पुढील लढाईसाठी ताकद द्यावी, अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करत आहोत.

मंत्री आतिशी म्हणाल्या, केजरीवालांना जामीन मिळावा, असे दिल्लीकरांना वाटत आहे. भाजपच्या ईडी आणि सीबीआयने आपच्या एका नेत्याविरोधात तरी पुरावा दाखवावा. भाजप आणि मद्य व्यावसायिक शरथ रेड्डी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना का नोटीस पाठवली नाही किंवा अटक केली नाही, असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळ्याचे (Delhi Liquor Scam Case) मुख्य सुत्रधार असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला होता. तर केजरीवालांनी ईडीने आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. याच प्रकरणात मागील वर्षी अटक केलेले खासदार संजय सिंह यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला आहे.

मद्य घोटाळ्यात मिळालेले पैसे आपने गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे केजरीवालांसह संपूर्ण आप पक्षालाच त्याचा फायदा झाला आहे, असेही ईडीने म्हटले आहे. आपच्या आणखी काही नेत्यांची या प्रकरणात चौकशी होऊ शकते, याची चिंताही नेत्यांना आहे.

AAP Protest
Narendra Modi On Congress Manifesto : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगची विचारसरणी; पंतप्रधान मोदींचा घणाघात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com