Abhijit Deepke Warning : संसदेकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अभिजीत दीपके प्रचंड आक्रमक

Abhijit Deepke Parliament Morcha : दीपके म्हणाले की, मी अमेरिकेत असताना लोक मला सांगायचे की, कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, हे फक्त सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहील. पण आज जंतर-मंतरकडे जाणारे चारही रस्ते लोकांनी पूर्णपणे भरले आहेत.
Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narrativesSarkarnama
Published on
Updated on

Abhijit Deepke warning before Parliament march: दिल्लीतील जंतर मंतरवरून अवघ्या काही वेळात संसदेवर मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. केरळ भवनच्या जवळ हा मोर्चा अडवण्याचा पोलिसांची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट इशारा दिला आहे.

ते म्हणाले, "भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून या देशातील लोकशाही संपवण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही (आंदोलकांनी) जंतर-मंतरवर महिनाभर बसून लोकशाहीला पुन्हा जीवंत केले आहे.'

Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
CJP Protest : मोर्चापूर्वी जंतर-मंतरवर पोलिसांनी आणला दगडांनी भरलेले ट्रक; VIDEO शेअर करत अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले, "आंदोलनकर्त्यांवर..."

'देशभरातून लोक येथे येत आहेत. मी अमेरिकेत असताना लोक मला सांगायचे की, कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, हे फक्त सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहील. पण आज जंतर-मंतरकडे जाणारे चारही रस्ते लोकांनी पूर्णपणे भरले आहेत. आम्हाला संसदेकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.', असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात तब्बल 5 हजार जवान तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले की, या मोर्च्याला परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आमच्याकडे परवानगीचा अर्ज देखील आला नव्हता. पोलिसांनी कलम 163 लागू करत मोर्चे, आंदोलन यांना बंदी केली आहे.

सोनम वांगचुक यांच्या तीन अटी

सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्यासाठी सरकारपुढे तीन अटी ठेवल्या आहेत.

  • नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी.

  • मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.

  • अटीमध्ये म्हटले आहे की, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.

Abhijit Deepke speaking on India’s Gen Z movement and controversial political narratives
Sonam Wangchuk Court : 20 दिवसांच्या उपोषणानंतरही सोनम वांगचुक यांना दिलासा नाही; सफदरजंग रुग्णालयातून हलवण्यास न्यायालयाचा नकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com