शीना बोरा जिवंत आहे ; इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक दावा

''सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा,'' अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे. पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
indrani mukerjea, Sheena Bora

indrani mukerjea, Sheena Bora

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : शीना बोरा (Sheena Bora) हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने (indrani mukerjea) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (cbi)ने पत्र लिहिलं असून यात त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जीने वकील याप्रकरणी लवकरच न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. आरोपी इंद्राणी मुखर्जीने तुरुंगातून सीबीआयला पत्र लिहिले आहे.

इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याचा दावा पत्रात केला आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ''सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा,'' अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे. पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली सहा वर्ष तुरूंगात आहे. गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदारांची चैाकशी करण्यात आली आहे. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती.

इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळला आहे. 2017 पासून इंद्राणीनं जामिनासाठी आतापर्यंत सहा वेळा अर्ज केले होते.

इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याचा दावा पत्रात केला आहे. कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ''सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा,'' अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे. पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहामध्ये आहे. इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याला पिस्तुलसोबत पोलिसांनी अटक केल्यानंतर शीना बोरा हत्याकांड उघडकीस आला होता. चौकशीदरम्यान त्याने आपण अजून एका प्रकरणात सहभागी असल्याचं सांगत हत्याकांडाचा साक्षीदार झाला. इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये गळा दाबून शीना बोराची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com