दिलासादायक : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त; 24 तासांत साडेतीन लाख जणांना डिस्चार्ज

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरू असली तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट सुरू असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
active covid cases in india drops for second consecutive day
active covid cases in india drops for second consecutive day
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरू असली तरी सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट सुरू असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्णांच्या (Patients) संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 11 हजार 122 ने घसरण होऊन ती 37 लाख 4 हजार 99 वर आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना संसर्गामध्ये सक्रिय रुग्णसंख्या आता 15.87 टक्के आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाना, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देशातील 82.51 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. देशात बरे झालेल्यांची संख्या आता 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 झाली आहे. मागील 24 तासांत 3 लाख 55 हजार 338 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 48 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 205 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 175 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. नवीन रुग्णांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 40 हजार 956, कर्नाटक 39 हजार 510, केरळ 37 हजार 290 रुग्ण आढळले आहेत. 

देशातील कोरोना मृत्यू दर 1.09 टक्के आहे. मागील 24 तासांत 4 हजार 205 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 793 मृत्यू नोंदवण्यात आले असून, त्याखालोखाल कर्नाटकात 480 मृत्यू झाले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोना लशीचे 17.52 कोटी डोस देण्यात आले आहेत. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com