Jharkhand Politics : पिक्चर अभी बाकी है! नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच आमदार निघाले राज्याबाहेर अन् सोरेन कोठडीत...

Champai Soren : चंपई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, काँग्रेस व राजदच्या प्रत्येकी एका आमदारानेही घेतली शपथ...
Champai Soren
Champai SorenSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand : झारखंडला नवे मुख्यमंत्री मिळाले असून अखेर चंपई सोरेन यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे नेते आलमगीर अलान आणि राष्ट्रीय जनता दलाचे सत्यानंद भोग्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण एकीकडे शपथविधी सुरू असताना सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदार राज्याबाहेर जाण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, हेमंत सोरेन यांना कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने अटक केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला होता. राज्यपालांकडून नव्या सरकारला शपथविधीसाठी वेळ दिला जात नसल्याने चंपई सोरेन (Champai Soren) यांनी काल सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपालांकडून वेळ दिला जात नसल्याचे त्यांनी राजभवनात बाहेर पडल्यानंतर मीडियाला सांगितले होते.

Champai Soren
Congress Leader Statement: काँग्रेसच्या खासदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'दक्षिण भारताला स्वतंत्र देश जाहीर करा'

अखेर राज्यपालांनी आज दुपारी चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) उपाध्यक्ष असून राज्यात टायगर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नावाआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होती. पण आमदार सीता सोरेन यांनी त्यांना विरोध केल्याने चंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

सत्ताधारी आमदार निघाले हैद्राबादला

एकीकडे चंपई सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार राज्याबाहेर पडण्याच्या तयारी करत होते. जवळपास ३८ आमदार हैद्राबादमध्ये जाणार असल्याचे समजते. नव्या सरकारीच दहा दिवसानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी होणार आहे. त्यावेळी हे सर्व आमदार राज्यात परतणार असल्याचे समजते. त्यामुळे तोपर्यंत राज्याचा कारभार तीन मंत्र्यांच्या खांद्यावर असणार आहे.

दहा दिवसांनी होणार बहुमत चाचणी

राज्यपालांनी शपथ देण्यापुर्वी चंपई सोरेन यांना दहा दिवसांत बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे 48 आमदार आहेत. त्यामुळे सत्ताधारी सहजपणे बहुमत सिध्द करतील, असा दावा केला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार, याकडेही देशाचे लक्ष लागले आहे.

हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी

ईडी (ED) विशेष कोर्टाने हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. ईडीने कोर्टाकडे दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सोरेन यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात केलेली याचिकाही सकाळी फेटाळण्यात आली आहे. त्यांना झारखंड हायकोर्टात दाद मागण्यास सांगितले आहे.

Champai Soren
Hemant Soren News : नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com