टीव्हीवरील बातमी बघून सुचली केंद्रीय मंत्र्याला खंडणी मागण्याची कल्पना अन्...

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Narendra Modi and Ajay Mishra

Narendra Modi and Ajay Mishra

Sarkarnama
Published on
Updated on

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यातच मिश्रा यांना त्यांच्या मुलाचा व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील बातमी बघून ही कल्पना आरोपींनी सुचला होती.

अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्याने चिरडल्याचा व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात येत होते. यासाठी त्यांच्याकडून अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याची तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. या आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले आहेत. आरोपींनी टीव्हीवरील बातमी बघून ही कल्पना सुचल्याचे कबूल केले आहे.

लखीमपूर खीरीत शेतकऱ्यांना चिरडल्याची बातमी आरोपींनी टीव्हीवर पाहिली. त्यावेळी त्यांनी अजय मिश्रांना ब्लॅकमेल करण्याची कल्पना सुचली. आशिष मिश्राचे काही व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असे सांगून त्यांना पैसे मागण्याचे त्यांनी ठरवले. अजय मिश्रा हे स्वत:कडे मोबाईल ठेवत नसल्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकाला त्यांना कॉल करुन पैशाची मागणी केली होती.

मिश्रा यांच्या स्वीय सहाय्यकाला या महिन्यात 40 कॉल आले होते. आशिषने शेतकऱ्यांना चिरडल्याचे व्हिडीओ जाहीर करण्याची धमकी त्यांना देण्यात येत होती. दिल्ली पोलिसांच्या तपासात हे कॉल व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलवरुन करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे हे कॉल कुठून येत आहेत, हे शोधणं अवघड होते. या खंडणीखोरांनी 17 ते 23 डिसेंबरदरम्यान 40 कॉल केले होते. हे कॉल नोएडातील सेक्टर 15 मधून आल्याचे अखेर समोर आले. हे कॉल अमित कुमार नावाच्या व्यक्तीच्या कार्यालयातून केल्याचे उघड झाले. अमित कुमार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबीर नावाच्या मित्राचे नाव उघड केले. ही पैसे उकळण्याची कल्पना होती. त्याने अमित माझी आणि निशांत या सहाय्यकांना कॉल करण्यास सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण कॉलसेंटरमध्ये काम करीत होते.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and&nbsp;Ajay Mishra</p></div>
बारा आमदारांच्या निलंबनाचं काय? झिरवाळांचा अखेर सचिवालयाला आदेश

लखीमपूर खीरी घटनेचा तपास करणाऱ्या एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी सुरू असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and&nbsp;Ajay Mishra</p></div>
धक्कादायक : केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनाच केलं ब्लॅकमेल अन् मागितली अडीच कोटींची खंडणी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com