पंजाब जिंकल्यावर भगवंत मान यांनी केजरीवालांचे आभार मानत धरले पाय...

पंजाबमधील 117 विधानसभा जागांपैकी 92 जागांवर आप'चे (AAP) उमेदवार विजयी झाले आहे.
Arvind Kejriwal & Bhagwant Mann
Arvind Kejriwal & Bhagwant MannSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश (UP),उत्तराखंड, पंजाब, (Punjab Assemlbly Election-2022) गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निकाल लागला आहे. यामध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मोठे यश मिळाले असून कॅाग्रेसला (Congress) पछाडत एकहाती सत्ता मिळवली आहे. याबरोबरच आपला गोव्यातही (GOA) चांगले यश मिळाले असून येथेही दोन उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच घोषित करत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या या खेळीला फायदा पक्षाला झाला असून पंजाबमधील 117 विधानसभा जागांपैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहे. या विजयानंतर मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पाय धरले आणि त्यांचे आभार मानले. तसेच शपथविधी सोहळ्याला येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

Arvind Kejriwal & Bhagwant Mann
फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार : सुजय विखेंच्या दाव्याने खळबळ

पंजाब विजयानंतर आपल्या पक्षप्रमुखांचे आभार मानण्यासाठी भगवंत सिंग मान यांनी आज (ता.11 मार्च) दिल्ली गाठली आणि केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल व सिसोदिया या दोघांचेही आभार मानत चरणस्पर्श केले. 2017 साली पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत आपचे फक्त 20 आमदार निवडूण आले होते. मात्र, आता झालेल्या निवडणुकीत पक्षाने सर्वच पक्षांना धूळ चारत 92 आमदार निवडुण आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्तेत असणाऱ्या कॅाग्रेसला 77 जागांवरून केवळ 18 जागा मिळवता आल्या तर, अकाली दल आघाडीला चार व आक्रमकपणे निवडणुक लढवलेल्या भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये पुर्व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चन्नी, आणि कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा समावेश आहे.

Arvind Kejriwal & Bhagwant Mann
दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर नाना खूष !

दरम्यान, आज मान यांनी केजरीवाल यांची भेट घेलली आहे. या भेटीनंतर केजरीवाल यांनी भेटीचा फोटो ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, माझा छोटा भाऊ भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ते आज माझ्या घरी शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी आले होते. मला पूर्ण विश्वास आहे की, मान एक मुख्यमंत्री म्हणून पंजाबच्या प्रत्येक लोकांची इच्छा पूर्ण करतील, असा प्रतिक्रिया केजरीवालांनी व्यक्त केली आहे. मान यांचा 16 मार्चला शपथविधी होणार आहे. त्या आधी 13 मार्च रोजी मान हे केजरीवाल यांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com