Ahmedabad Air Plane Crash : कोसळलेल्या विमानाचे पायलट नवखे नव्हते…किती होता अनुभव?

How Experienced Were the AI 171 Pilots? : वैमानिकाचा अनुभव हा तो किती वर्षांपासून हवाई क्षेत्रात काम करत आहे यावरुन ठरत नाही. तर त्याने आजवर किती तास विमानाचे उड्डाण केले आहे, त्यावरून त्याचा अनुभव निश्चित केला जातो.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Ahmedabad Air Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवारी लंडन येथे जाण्यासाठी झेपावलेलं एअर इंडियाचे(एआय १७१) हे विमान काही मिनिटांतच येथील मेघानीनगर परिसरात कोसळलं. अन् होत्याचं नव्हतं झालं....विमानतल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. एकच प्रवाशी यात वाचला आहे. या विमानात दोन वैमानिक व दहा कर्मचारी होते त्या सगळ्यांचा या अपघातात मृत्यू झाला.

कोसळलेल्या 'एआय १७१' विमानातील मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांना तब्बल आठ हजार दोनशे तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, तर त्यांच्या बरोबर या विमानात सहवैमानिक असलेल्या क्लाईव्ह कुंदर यांना अकराशे तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, अशी माहितीही डीजीसीएने दिली आहे.

वैमानिक होण्याचं अनेकाचं स्वप्न असतं. मात्र त्यासाठी काही आंतरराष्ट्रीय नियम असतात. त्या नियमानुसार वैमानिक होऊ इच्छिणाऱ्या संबधित उमेदवाराकडे कमीतकमी २०० तास विमान उडविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याला व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळतो. परवाना मिळाल्यानंतरच संबधित पायलट उड्डाण करण्यासाठी पात्र ठरतो.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad plane crash : विमान थोडे आणखी पुढे गेले असते तर कदाचित सगळे वाचले असते.. कारण..

वैमानिकाचा अनुभव हा तो किती वर्षांपासून हवाई क्षेत्रात काम करत आहे यावरुन ठरत नाही. तर त्याने आजवर किती तास विमानाचे उड्डाण केले आहे, त्यावरून त्याचा अनुभव निश्चित केला जातो. मात्र पुरेसा अनुभव असला तरी वैमानिकाला वर्षातून एकदा तरी सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

या सिम्युलेटरमध्ये विमान प्रवासादरम्यान उद्भवू शकणाऱ्या अनपेक्षित घटना कृत्रिम पद्धतीने दाखवल्या जातात. अशा प्रसंगी वैमानिक कशी प्रतिक्रिया देतो आणि परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवतो, याचे परीक्षण केले जाते. विमान उत्पादक कंपन्या सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या प्रकारची विमाने विकसित करत असतात. अनुभवी वैमानिकांनाही नव्या विमानाचा तांत्रिक आणि सुरक्षित वापर शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक असते."

वैमानिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता आवश्यक असतात."जे विद्यार्थी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले असतात आणि ज्यांचे वय किमान १७ वर्षे पूर्ण झालेले असते, त्यांना वैमानिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. मात्र, उमेदवाराचे वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक असते. एकदा प्रवेश घेतल्यानंतर, त्यांना सुमारे ८ ते १० महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते, जे तीन टप्प्यांमध्ये विभागलेले असते. (Air India)

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad plane air crash: अहमदाबाद अपघातातील विमानाचे सहवैमानिक होते नाशिकचे बाळासाहेब पाठक, कुटुंबियांना म्हणाले होते, गुड मॉर्निंग!

प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५० तासांचे शैक्षणिक सत्र असते. यामध्ये हवाई वाहतुकीचे नियम, दिशादर्शनाचे तंत्र, सिम्युलेटर प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाणासंदर्भातील मूलभूत माहिती दिली जाते. पुढील टप्प्यांमध्ये जवळपास २०० तासांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये विमानाचे यांत्रिक परीक्षण, रेडिओ संवाद तंत्रज्ञान आणि उड्डाण कौशल्यांवर विशेष भर दिला जातो.

प्रत्यक्ष उड्डाण प्रशिक्षणातही विशिष्ट टप्पे असतात - यामध्ये प्रशिक्षकासोबत उड्डाण, एकट्याने विमान चालविणे, वेगवेगळ्या विमानतळांदरम्यान उड्डाण करणे, तसेच रात्रीच्या वेळेस विमान उडविण्याचा सराव अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो." (Ahmedabad Gujarat)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com