
Pune News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. पण तरीही यामध्ये काही आर्थिक सक्षम महिलांनीही अर्ज करून लाभ घेतल्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आता आयकर विभागाकडून याची माहितीही मिळाल्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल 20 लाख लाडक्या बहिणी आता सरकारच्या रडारवर आल्या आहेत.
राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण यात आर्थिक सक्षम महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यानंतर आता पुण्यासह राज्यभर आयकर विभागाच्या डेट्यातून छाननी जोरात सुरू आहे. आयकर भरणाऱ्या महिला जर लाभार्थी यादीत सापडल्या, तर त्यांची नावे 'स्वयंचलित पद्धतीने' योजनेतून वगळली जाणार आहेत. यापूर्वीच, राज्यातील अंदाजे दोन हजार शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर त्यांची नावे वगळण्यात आली होती.
राज्य सरकारने यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले असून, त्यात लाभार्थ्यांची यादी आहे. त्या यादीची तुलना आयकर विभागाच्या डेटासोबत केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे अधिकृत परवानगी मागितली होती. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 3 जून 2025 रोजी एक अधिसूचना काढत महिला व बालविकास विभागाला आयकर भरणाऱ्या महिलांचा डेटा मिळवण्याची परवानगी दिली आहे.
ही योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै 2024 मध्ये सुरू केली होती. सुरुवातीला अर्जांची अंतिम तारीख 15 जुलै होती, परंतु प्रतिसाद लक्षात घेता ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. नंतर सप्टेंबर अखेरपर्यंतही अर्ज स्वीकारले गेले.
दरम्यान मार्च 2025 मध्ये सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील आर्थिक सक्षम लाभार्थ्यांची नावेही वगळली होती. त्याच धर्तीवर आता ‘लाडकी बहीण’ योजनेतील इनकम टॅक्स भरणाऱ्या महिलांची छाननी सुरु आहे.
अशी आहे लाभार्थीची संख्या
आंबेगाव - 62, 232
भोर - 50, 995
दौंड - 98,167
हवेली - 4,09,709
इंदापूर - 1, 06, 354
जुन्नर - 1, 01, 036
खेड - 1,15,162
अशी आहे लाभार्थीची संख्या
मावळ - 93, 742
मुळशी - 45, 963
शिरूर - 1,00,343
वेल्हा - 14, 241
पुरंदर - 65, 082
पुणे शहर - 6, 74, 045
एकूण - 20, 55, 133
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.