Ajit Doval : अजित डोवाल रॉ एजंट असताना सापडले होते धर्मसंकटात; टोचलेल्या कानांमुळे काय घडलं पाकिस्तानमध्ये ?

Ajit Doval RAW agent News : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. परदेशापासून ते भारतीय भूमीपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
Ajit Doval
Ajit Dovalsarkarnama
Published on
Updated on

Ajit Doval in Pakistan News : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्यामध्ये दहशतवादी तळावर हल्ला करीत मोठ्या प्रमाणात दहशतवादाच्या खात्मा करण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशादरम्यानचा तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. परदेशापासून ते भारतीय भूमीपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

यापूर्वी त्यांनी पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये भारतीय मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळेच डोवाल (Ajit Doval) यांना भारताचा जेम्स बॉण्ड असे म्हटले जाते. डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये 'रॉ' एजंट म्हणून 7 वर्ष काम केले आहे. या काळात गुप्तपणे पाकिस्तानमध्ये राहत असताना एकदा ते एकदा धर्मसंकटात सापडले होते. टोचलेल्या कानामुळे त्यांची हिंदू अशी ओळख उघड होण्याची वेळ आली होती, असा किस्सा डोवाल यांनीच एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितला.

Ajit Doval
India Pakistan War Ceasefire Violation : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, आत्तापर्यंत काय काय घडलं?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानमध्ये 7 वर्ष 'रॉ' एजंट म्हणून काम केले आहे. या काळात ते गुप्तपणे पाकिस्तानमध्ये राहून भारतासाठी काम करत होते. मात्र, पाकिस्तानमध्ये काम करीत असताना एकदा ते धर्मसंकटात सापडले होते. त्याठिकाणी काम करत असताना त्यांची ओळख उघड होण्याची वेळ आली होती, असा किस्सा डोवाल यांनी स्वतःच माध्यमांशी बोलताना सांगितला होता.

Ajit Doval
India Pakistan War : युद्धात वापरलेली ड्रोन्स नेमकी कोणती?

एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान त्यांना विचारण्यात आले की, पाकिस्तानमध्ये मुस्लीम बनून राहत असताना त्यांना कधी धर्मसंकटाचा सामना करावा लागला का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित डोवाल म्हणाले, 'पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका मजारजवळ ते थांबले होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला. त्यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. "तू हिंदू आहेस का?" त्यावर त्यांनी हिंदू असल्याचे नाकारले होते.

Ajit Doval
India Pakistan Partition Army division : फाळणीवेळी पाकिस्तानला किती सैन्य मिळाले...

त्यानंतर डोवाल म्हणाले की, त्या व्यक्तीने त्यांना एका खोलीत नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर त्याने 'तुमचे कान टोचलेले आहेत आणि हे फक्त हिंदूच करतात." त्यानंतर अजित डोवाल यांनी ते हिंदू आहेत, याचा स्वीकार केला होता. यावर तो व्यक्तीने त्यांना "तुमच्या कानाची प्लास्टिक सर्जरी करून घ्या, असा सल्ला दिला होता. डोवाल यांना हा सल्ला देणारा व्यक्ती देखील हिंदूच होता आणि वेश बदलून पाकिस्तानमध्ये राहत होता, असेही त्यांनी सांगितले. ती विचारणा करणारी व्यक्ती हिंदू असल्याने माझी अडचण झाली नसल्याचे, त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Ajit Doval
India Pakistan Partition Army division : फाळणीवेळी पाकिस्तानला किती सैन्य मिळाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com