BJP Political Earthquake : महाराष्ट्रानंतर आणखी तीन राज्यांत राजकीय भूकंप? भाजप आपल्याच तीन मुख्यमंत्र्यांना हटवणार? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Akhilesh Yadav Claims BJP May Remove Three Chief Ministers Amid Operation Tiger Political Developments : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना भाजपने मोठं बळ देवून ठाकरेंचे पुन्हा एकदा खासदार फोडले आहेत. यामुळेच आता राज्यात मोठ्या राजकीय बदलांची चर्चा होताना दिसत आहे. अशातच भाजप आपल्या तीन मुख्यमंत्र्यांना बदलण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
BJP Politics
BJP Politicssarkarnama
Published on
Updated on

BJP Major Leadership Changes News : राज्यात ऑपरेशन टायगर झाले असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिंदेंची बारगेंनिग पॉवर आता वाढली असून शिवसेनेला केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे मिळू शकतात. तसेच त्यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे. या चर्चामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या तर्क वितर्कांना उत आला असतानाच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या बचावाची भूमिका घेत भाजपचा गेम प्लॅन उघड केला आहे. तर भाजप आपल्या तीन मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवू शकतं असा दावा करताना योगींच्या आधी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा मानस भाजपचा असल्याचे म्हटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात सध्या ऑपरेशन टायगरने राजकीय खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन असेच सुरू राहणार असल्याचा इशारा थेट विधीमंडळातूनच दिला आहे. यामुळे ठाकरेंचे उरलेले तीन खासदार, आमदारांसह त्याचे मुंबईतील नगरसेवक देखील आता शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशी कुजबूज आहे.

BJP Politics
BJP Politics : मुख्यमंत्री बदलताच आता विरोधी पक्षनेताही बलणार? भाजपमध्ये चर्चांना वेग, बड्या नेत्याचा पत्ता कट होणार

या ऑपरेश टायगरमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले अशतानाच भाजपशासित राज्यात मोठी उलथापालथ होईल. एक नाही तर तब्बल तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना भाजप हटवेल असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

साम टीव्हीच्या वेबवर आलेल्या वृत्तानुसार अखिलेश यादव यांनी मोहन यादव यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी करत मोहन यादव यांच्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोपही केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या जमिनीच्या वादात अडकले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. पण विरोधी पक्षाकडून मोहन यादव यांना पाठिंबा मिळत आहे. याचवेळी अखिलेश यादव यांनी मोहन यादव यांच्याह भाजपशासित राज्यातील दोन एक मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेशसह राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील राजकारण तापलं आहे.

अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका करताना मोहन यादव हे आधी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होते. आता त्यांच्यावर जमिनीशी संबंधित आरोप केले जात आहेत. म्हणे मोहन यादव यांनी ३०० ते ६०० एकर जमीन संपादित केलीय. यात काहीही नवीन नाहीये. पण भाजपला हे माहीत नाही का? हे आरोप फक्त यामागे देखील मोठं कारस्थान असून भाजपला मोहन यादव यांना मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवायचे आहे.

BJP Politics
BJP Politics : एकही निवडणूक न जिंकलेल्या नेत्यामुळे भाजपमध्ये भूकंप; पक्ष फुटण्याची भीती, खुद्द अमित शाह मैदानात?

तसेच आणखी दोघा मुख्यमंत्र्यांनाही बदलायचं असल्यानेच हे आरोप घडवून आणले जात आहेत. यावेळी अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण या राज्यांची नावे घेत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा कट भाजपचा असून तसा भाजपचा मानस असल्याचा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com