karnataka politics : कर्नाटकमध्ये पुन्हा संघर्ष? भाजपमध्ये जोरदार हालचाली; विरोधी पक्षनेतेपद बदलणार? नावही झाले फिक्स

BJP Reshuffle Discussion During DK Shivakumar Takes Oath as Karnataka Chief Minister : डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर १२ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
DK Shivakumar Oath
DK Shivakumar Oathsarkarnama
Published on
Updated on

BJP Opposition Leader Change News : कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसमध्ये उसळलेले बंड अखेर सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर शांत झाले असून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या खांदेपालटामुळे कर्नाटकच्या नेतृत्वाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

या सर्व घडामोडीदरम्यान भाजपमध्ये देखील जोरदार राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे शिवकुमार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच भाजपमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते पदात बदल होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपमध्ये सध्या विरोधी पक्षनेते आर अशोक असून यांच्या जागी कारकळचे आमदार सुनीलकुमार यांना संधी देण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे पद राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे घटनात्मक पद मानले जाते. सरकारला सभागृहात आणि सभागृहाबाहेर प्रभावीपणे घेरणे, प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर आणणे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे या जबाबदाऱ्या विरोधी पक्षनेत्याकडे असतात. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या काँग्रेस सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यासाठी भाजप आपली रणनीती बदलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला कोंडीत पकडण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलेले सुनीलकुमार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

DK Shivakumar Oath
Karnataka Politics: कर्नाटकात 'डीकेएस'पर्व; 'सिध्दा'ही रिंगणात राहणार; काँग्रेसचे 'दक्षिणापथ', '२०२९'चाही बिगुल

अशोक यांच्याविषयी नाराजी?

राज्य सरकारविरोधात प्रभावी संघर्ष उभारण्यात भाजप नेतृत्व अपयशी ठरत असल्याची भावना पक्षाच्या काही अंतर्गत गटांत व्यक्त होत आहे. त्यातूनच विरोधी पक्षनेतेपदाच्या बदलाची चर्चा पुढे आली आहे. मात्र, अशोक यांची हकालपट्टी किंवा बदल याबाबत भाजपच्या राज्य नेतृत्वाने अथवा केंद्रीय नेतृत्वाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अशा प्रकारच्या चर्चा राजकीय पक्षांत नेहमीच होत असल्या तरी अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जातो.

‘बंगळूरपुरतेच मर्यादित’ असल्याची टीका

अशोक यांच्याविरोधात आणखी एक आरोप म्हणजे त्यांचे राजकारण प्रामुख्याने बंगळूरपुरते मर्यादित राहिल्याचे. राजधानीतील नागरी प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असले तरी उत्तर कर्नाटक किंवा जुन्या म्हैसूर विभागातील प्रश्नांवर त्यांचा प्रभावी हस्तक्षेप कमी असल्याची भावना राज्यातील इतर भागांत आहे.

DK Shivakumar Oath
Karnataka Politics : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली

सुनीलकुमार यांना संधी?

सुनीलकुमार हे मागासवर्गीय समाजातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यास भाजपला मागासवर्गीय मतदारांमध्येही बळकटी मिळू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मंगळूर (दक्षिण कन्नड) आणि किनारीपट्टी भागात पक्षाची संघटना मजबूत करण्यात त्यांचे योगदान मोठे मानले जाते. संघटनात्मक अनुभव, आक्रमक शैली आणि केंद्रीय नेतृत्वाशी असलेले सुसंवाद हे त्यांचे बलस्थान मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com