BJP Politics : एकही निवडणूक न जिंकलेल्या नेत्यामुळे भाजपमध्ये भूकंप; पक्ष फुटण्याची भीती, खुद्द अमित शाह मैदानात?

K Annamalai latest news : अण्णामलाई यांना पक्षातच थांबविण्यासाठी नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात असल्याचे वृत्त आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP internal politics : आंध्र प्रदेश वगळता दक्षिणेतील एकाही राज्यात सत्तेत नसलेल्या भाजपसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तमिळनाडूतील पक्षाचा सर्वात मोठा चेहरा असलेले के. अण्णामलाई पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठा भूकंप झाला आहे. पक्षात नाराज असलेले अण्णामलाई लवकरच बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

तमिळनाडूत अण्णामलाई यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्समुळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. यापार्श्वभूमीवर अण्णामलाई सोमवारी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. तसेच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. दिल्लीतील घडामोडींवर अण्णामलाईंचे भूमिका ठरणार आहे.

अण्णामलाई यांना पक्षातच थांबविण्यासाठी नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेत निवडून आणून दिल्लीच्या राजकारणात सक्रीय केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, अण्णामलाई त्यासाठी तयार होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. प्रामुख्याने तमिळनाडच्या राजकारणात सुपरस्टार विजय यांचा उदय झाल्यानंतर अण्णामलाई भाजपपासून वेगळे होणार, या चर्चा सुरू झाल्या आहेत.

BJP
Abhijeet Dipke: “माझा चेहराही दाखवतो आता”; अभिजीत दिपकेला धमकी देणारा तरुण आला समोर, २३ तास झाले पण पोलिसांना सापडेना

एकाही निवडणुकीत विजय नाही

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर ते एखाद्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आपले काम सुरू करू शकतात. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून विधानसभा आणि लोकसभेचीही निवडणूक लढविली आहे. पण एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेले नाही. जवळपास पाच वर्षे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. पण पक्षाला अपेक्षित फायदाही झाला नाही.

BJP
CM झाल्याशिवाय दाढी करणार नाही! तुरुंगात असतानाच घेतली होती शपथ

एआयएडीएमकेशी युती करण्याच्या मुद्द्यावरून अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले. त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. तेव्हापासून ते पक्षात फारसे सक्रीय नाही. तामिळनाडूच्या प्रचारातही भाजपने त्यांना बऱ्यापैकी दूर ठेवले होते. एआयएडीएमकेशी युती करूनही भाजपला फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे अण्णामलाई यांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय़ घेतल्याची चर्चा आहे. आता भाजप त्यांना कसे रोखणार, याचीच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com