.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Akhilesh Yadav News : पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचा झटका उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला लागला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होणार आहे. भाजपविरुद्ध लढणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची रणनीती आयपॅक ही संस्था ठरवत होती. अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालमधील निकालानंतर आयपॅकसोबतचा करार रद्द केला आहे.
2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने Indian Political Action Committee (IPAC) ला काम दिले होते. 2021 मध्ये या संस्थेने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजय मिळवून दिला होता. तसेच तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना विजय मिळवून दिला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाने आयपॅकसोबत करार करण्याबाबत विचार करत होती.
'टीव्ही 9 भारत वर्ष' या हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अखिलेश यादव यांनी आयपॅकसोबत करार रद्द करण्यामागे सर्वात मोठे कारण हे आयपॅकवर ईडीने केलेली कारवाई हे आहे. बंगालच्या निवडणुका सुरू असताना आयपॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला. त्यांच्या मुख्य संचालकांना देखील अटक करण्यात आली होती. त्यामुळे या संस्थेपासून लांब राहण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने दीड महिन्यापूर्वीच आयपॅकसोबत करार केला होता. त्यानंतर आयपॅककडून समाजवादी पक्षासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. आयपॅकवर सुरू असलेल्या कारवाईमुळे आपली रणनीती आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे लीक होण्याचा धोका समाजवादी पक्षाला वाटला. त्यामुळे करार स्थगित न करता थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बाहेरील कंपनीशी करार करण्यात येणार नसल्याचे समाजवादी पक्षामध्ये चर्चा आहे. पक्षातील नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांच्या माध्यमातूनच रणनीती आखण्यात येणार आहे. सर्वे आणि इतर कामांसाठी वेगवेगळ्या कंपन्यासोबत करार करण्यात येणार आहे. मात्र, पूर्णपणे एका कंपनीच्या कामावर अवलंबून न राहण्याची रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.