Akhilesh Yadav on Missing Hindu Voters : 'योगींच्या आकड्याने भाजपचा गेम बिघडवला!' अखिलेश यादवांनी मांडले 2027 च्या पराभवाचे गणित; प्रत्येक मतदारसंघात 31 हजार मतांचा फटका?

Akhilesh Yadav targets Yogi Adityanath over the claim 1.27 crore missing Hindu voters, alleging BJP faces major setback ahead 2027 UP Assembly elections : उत्तर प्रदेशच्या मतदार यादीतून 1 कोटी 27 लाख हिंदूंची नावे गायब झाल्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यावरून अखिलेश यादव आक्रमक; 'भाजपने पराभव आधीच मान्य केला', म्हणत रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या महारॅलीतून भाजपची कोंडी.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on: 
Updated on: 

UP Voter List 1.27 Crore Missing Voters : दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या मोर्चात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अखिलेश यादव यांनी या रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

याचवेळी भाजपच्या पराभवाचे गणित सांगताना, अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदार यादीत गायब झालेल्या हिंदू मतदारांचा आकडा सांगत खळबळ उडवून दिली. हिंदूंच्या गायब मतदारांमुळे उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात भाजपला जवळपास 31 हजार 514 मतांचे नुकसान निश्चित असल्याचा दावा करून, अखिलेश यादव यांनी भाजपचीच कोंडी केली.

अखिलेश यादव यांनी, उत्तर प्रदेशातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मतदार यादीतून सुमारे 1 कोटी 27 लाख हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याता दाखल देत, निवडणुकीतील संभाव्य पराभवाचे कारण आधीपासूनच सिद्ध करण्यासाठी आधार तयार केल्याचा टोला लगावला.

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या (BJP) पारंपरिक मतांमध्ये घट झाली आहे. त्याच प्रमाणात गणित मांडून हा मोठा आकडा सांगण्यात आला आहे. याचा अर्थ, भाजपची जवळपास 1 कोटी 27 लाख मते कमी होणार आहेत, हे त्यांनी आधीच मान्य केले आहे. ही काही सहजासहजी मिळालेली सामान्य माहिती नाही. जर हा आकडा निवडणूक आयोगाकडून मिळाला असेल, तर उद्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही दिल्लीतील रामलीला मैदानावर येऊन 'कुणाला तरी हटवण्याची' मागणी केली पाहिजे, असा उपहासात्मक टोलाही अखिलेश यादव यांना लगावला.

Akhilesh Yadav
India Alliance Rally : 'गुप्तचर यंत्रणेचा अंदाज चुकला?' रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा जनसागर; भाजपच्या राजकीय गणिताला धक्का!

अखिलेश यादव यांनी, या गायब हिंदू मतदारांचे गणित मांडताना, उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात भाजपला जवळपास 31 हजार 514 मतांचे नुकसान होणार आहे. म्हणजेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच शस्त्रे खाली ठेवली आहेत. या हिंदू गायब मतदारांचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे दिल्लीतील आपल्याच सरकारवर आरोपही केला आहे. जेणेकरून निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वतःवर येऊ नये, अशीही कोपरखळी लगावली आहे.

Akhilesh Yadav
Mahayuti Government : 'महायुती कोसळेल!' काँग्रेस नेत्याचे मोठे भाकीत; विधान परिषदेच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांत भूकंप

उत्तर प्रदेशातील जागरूक मतदार विचारत आहेत की, विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच हा आकडा का समोर आला? केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता, त्यांच्या दौऱ्यांचा संदर्भ देत, हा आकडा का जाहीर करण्यात आला? कुठे असे तर नाही ना की, 'यांच्याही' हातात बदलीची चिठ्ठी देऊन कोणीतरी परत गेले आहे? असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला.

अब्जावधींचा घोटाळ्याचा अखिलेश यादव यांचा आरोप

मतदार यादीत 55 लाख लाभार्थ्यांची नावे नसल्याचा जो दावा केला जात आहे, त्यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. ज्या लाभार्थ्यांची नावे मतदार यादीतून गायब आहेत, त्यांच्या जागी सरकारी योजनांचा पैसा नेमका कोणाला मिळत होता? तो पैसा कोण खात होते? हा स्वतःमध्येच अब्जावधी रुपयांचा घोटाळा आहे, जो भाजपच्या सत्ताकाळात सुरू आहे, असा गंभीर आरोप करत अखिलेश यादव यांनी खळबळ उडवून दिली. राज्यात डबल इंजिनचे सरकार असल्याने या महाघोटाळ्यात दोन्ही सरकारांचा सहभाग असल्याचा दावा करत, भाजपने स्वतःच्याच डबल इंजिन सरकार अडचणीत आणल्याचा घणाघात अखिलेश यादवा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनीच भाजपला अडचणीत आणले

लाखो तरुणांची नावे मतदार यादीत नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे हेही स्पष्ट केले आहे की, उत्तर प्रदेशातील तरुणही त्यांना मतदान करणार नाहीत. एकंदरीत, मुख्यमंत्री योगी यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकीतील आपल्या संभाव्य पराभवाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. त्याचबरोबर, डबल इंजिन सरकारमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे आकडे म्हणजे दिल्लीतील सरकारकडून आपल्याला पराभूत करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचे चित्रही ते हळूहळू निर्माण करत आहेत. कारण मतदार यादीतील घोळाचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे, केंद्रात सत्तेवर असलेल्या स्वतःच्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे आहे, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्र्यांनी हे सर्व गौप्यस्फोट 'दिल्ली चलो, वोट बचाओ-देश बचाओ' या महारॅलीच्या अगदी एक दिवस आधीच का केले? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असेही अखिलेश यादव यांनी शेवटी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.