Alex Sequera News : आलेक्स सिक्वेरांचा मोठे विधान; म्हणाले, 'मला मंत्रिपदावरून हाकलून लावावे, अशी अनेकांची इच्छा'

Political controversies News : सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र अवशेष प्रदर्शनाच्यावेळी सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली गेली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सासष्टीच्या काही प्रमुख नागरिकांनी बुधवारी त्यांची भेट घेतली.
Alex Sequera
Alex Sequera Sarkarnama
Published on
Updated on

Madgaon News : 'मी मंत्रिपदावर असलेलो कित्येकांना खटकते. मला मंत्रिपदावरून हाकलून लावावे, अशी कित्येकांची इच्छा आहे आणि त्यामुळेच अशा व्यक्ती माझ्यामागे लागलेल्या सतत दिसतात', अशी प्रतिक्रिया कायदा व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी व्यक्त केली.

सिक्वेरा यांना मंत्रिपदावरून काढणार अशा आशयाचे वृत्त कित्येकवेळा ऐकू येत आहे. या पार्श्वभूमीवर सिक्वेरा यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकत्याच संपलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र अवशेष प्रदर्शनाच्यावेळी सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली गेली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सासष्टीच्या काही प्रमुख नागरिकांनी बुधवारी त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिक्वेरा यांनी आपले मत व्यक्त केले.

Alex Sequera
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांना अटक करा, अशी मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर जी आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्यामागे आपला कुठलाही हात नसल्याचा खुलासा सिक्वेरा यांनी परत एकदा केला.

Alex Sequera
Pune Politics : "गेले 5 वर्ष भाजपनेत्यांवर..." ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशच होताच भाजपमधील खदखद चव्हाट्यावर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरु आहेत. विद्यमान मंत्र्यापैकी ज्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे, त्यात सिक्वेरा यांचे नाव घेतले जाते. याबाबत अनेकवेळा वृत्त समोर आले आहे. सिक्वेरा यांच्या मतदारसंघात भाजप (Bjp) सदस्य नोंदणी कमी झाल्याने प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सिक्वेरांनी हा दावा खोडून काढला आहे.

Alex Sequera
Pune Corporators : महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणारे कोण आहेत पाच नगरसेवक

राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चांना आलेले ऊत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा थांबले आहे. आता मंत्रिमंडळ फेरबदल होणार नाही, असे सावंत म्हटल्याने या चर्चांना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे.

Alex Sequera
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com