Delhi News: राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या आरोपांना भाजपचे खासदार, संबित पात्रा यांनी जोरदार उत्तर दिले. तसेच राहुल गांधी हे ज्या अदानींवर आरोप करत आहेत त्यांना काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये कंत्राट दिल्याचा पलटवार केला.
संबित पात्रा म्हणाले, आंध्र प्रदेशात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांनी तेथे अदानी समूहासोबत जास्तीत जास्त व्यवहार केले आहेत. छत्तीसगडमध्ये भुपेश बघेला यांचे सरकार असताना अदानी यांना कंत्राट देण्यात आले. आरोप करण्यापेक्षा ते कोर्टात का जात नाही, असे देखील पात्रा म्हणाले.
अमेरिकेत लाच देण्याच्या प्रकरणात तपासादरम्यान ज्या चार राज्यांची नावे समोर आलीत आहेत त्यामध्ये त्यावेळी चार राज्यांमध्ये काँग्रेस किंवा त्यांचे मित्रपक्ष सरकारमध्ये होते. तामिळनाडू असो वा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड येथे सर्वत्र काँग्रेसचे सरकार होते, असे संबित पात्रा म्हणाले. तसेच अदानी भ्रष्ट असतील तर काँग्रेसने गुंतवणुकीला परवानगी का दिली? असा सवाल देखील पात्रा यांनी उपस्थित केला.
संबित पात्रा म्हणाले, भूपेश बघेल छत्तीसगडचे मुख्यमंत्री असताना अदानी यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. अशोक गेहलोत सरकारच्या काळातही अदानींनी गुंतवणूक केली होती. जर ते भ्रष्ट असतील तर त्यांनी इतकी गुंतवणूक का केली. कर्नाटक सरकारने परवानगी का दिली?
त्यांना वाटत असेल की काहीतरी चूक झाली आहे तर ते कोर्टात का जात नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी संबित पात्रा यांनी विचारला. तसेच राहुल गांधींना भारताचा शेअर बाजार पाडायचा आहे. त्यांच्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले, असा दावा पात्रा यांनी केला.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये तेलंगणा, कर्नाटकमध्येही डील्स झाल्याबाबत विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, या प्रकरणात जो कुणी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कुणाचेही सरकार असले तरी त्यावर कारवाई हवी. मी दोन-तीन दिवसांपूर्वी स्पष्ट म्हटले आहे की, जिथे भ्रष्टाचार आहे, तिथे चौकशी व्हावी. पण त्याची सुरूवात अदानींपासून व्हावी. त्याशिवाय हे शक्य होणार नाही. शेवटी यामध्ये मोदींचे नाव येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.