अमरिंदरसिंगांच्या पत्नीचाच काँग्रेस सोडण्यास नकार

अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रेणित कौर या काँग्रेसच्या खासदार आहेत.
Amarinder Singh And Preneet Kaur
Amarinder Singh And Preneet Kaur

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देणार आहेत. अपमानजनक वागणूक दिल्याचा ठपका ठेवत त्यांनी पक्षश्रेष्ठींवर टीका केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावरही प्रहार केला आहे. पुढील काही दिवसांत ते पक्षातून बाहेर पडत स्वतंत्र पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रेणित कौर (Preneet Kaur) या काँग्रेसच्या खासदार आहेत. अमिरिंदरसिंग यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयानंतर त्यांनी पतीसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पक्षातून बाहेर पडण्याचा कोणाताही विचार नाही. मी माझ्या पदावर कायम असून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमिरिंदरसिंग यांच्या घरात पुढील काही दिवसांत दोन पक्ष असतील.

Amarinder Singh And Preneet Kaur
सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या हवाई दल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

कौर यांनी पती अमरिंदरसिंग यांच्या भूमिकेचे समर्थनही केले आहे. त्या म्हणाल्या, काही काँग्रेस नेत्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. देशातील काँग्रेसचे ते ज्येष्ट नेते आहेत. इतर राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होत असताना त्यांनी पंजाबमध्ये पक्षाला सत्ता मिळवून दिली. तरीही त्यांचा अपमान झाला. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या नेत्याला अशी वागणूक मिळणे चुकीच आहे, असंही कौर यांनी स्पष्ट केलं.

कौर या पटियाला मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करत आहेत. कौर यांच्या मतदारसंघातच अमरिंदरसिंग प्रतिनिधित्व करत असलेला पटियाला शहर हा विधानसभेचा मतदारसंघ आहे. कौर यांच्या मतदारसंघात नऊ विधानसभेच्या जागा असून त्यापैकी सात जागा काँग्रेसकडे आहेत. अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडल्यानंतर या लोकसभा मतदारसंघासह राज्यातील किती आमदार त्यांच्या मागे जाणार, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.

Amarinder Singh And Preneet Kaur
कट्टर विरोधक दिग्विजयसिंहांच्या मदतीसाठी अमित शहाही धावले!

दरम्यान, पंजाब पोलिसांनी नुकतीच अमरिंदरसिंग यांच्या पत्नी खासदार प्रणित कौर आणि त्यांचे 19 सल्लागार आणि विशेष अधिकाऱ्यांची सुरक्षा कमी केली आहे. याबाबत पंजाब पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महांसचालक (सुरक्षा) कार्यालयाने आदेश काढला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दिलेल्या वेळेत कर्तव्यावर पुन्हा हजर राहण्याची तंबी दिली आहे. हे सुरक्षा कर्मचारी हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com