सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या हवाई दल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

कोईम्बतूर महिला पोलिसांनी हरमुखला 25 सप्टेंबर रोजी अटक केली होती.
Court hands over rape case to IAF.
Court hands over rape case to IAF.
Published on
Updated on

चेन्नई : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलातील (IAF) महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करणाऱ्या 29 वर्षीय अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल करण्यात येणार आहे. कोईम्बतूर येथील महिला न्यायालयानं हे प्रकरण भारतीय हवाई दलाकडं सोपविण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यानुसार आयएएफने या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आता त्याच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

फ्लाईट लेफ्टनंट अमितेश हरमुख असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. कोईम्बतूर महिला पोलिसांनी हरमुखला 25 सप्टेंबर रोजी अटक केली होती. बलात्काराची घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली आहे. याबाबत 28 वर्षीय सहकारी महिला अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला अटक केली आहे. पीडित महिलेने सुरूवातीला याबाबतची तक्रार सुरूवातीला हवाई दलाकडे केली होती.

Court hands over rape case to IAF.
केंद्रीय मंत्र्यांच्या नृत्याची पंतप्रधान मोदींनाही भूरळ

प्रत्यक्षात तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नाही. दोनवेळा त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी सांगण्यात आले होते. एका पत्रावर सही करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. पण पण तक्रार मागे घेतली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करावी लागली, असं या महिलेने म्हटले आहे. आता या महिला अधिकाऱ्याने पोलिस तक्रारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॅाक्टरांनी बंदी घातलेली 'टू फिंगर टेस्ट' केल्याचा खळबळजनक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये महिनेने गंभीर आरोप केले आहेत. हवाई दलाकडे केलेल्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी बंदी असलेली टू-फिंगर टेस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी लैंगिक अत्याचाराची दुसऱ्यांदा बळी ठरल्याचे या महिलेने म्हटले आहे.

Court hands over rape case to IAF.
कट्टर विरोधक दिग्विजयसिंहांच्या मदतीसाठी अमित शहाही धावले!

सर्वोच्च न्यायालयानेच टू-फिंगर टेस्टवर बंदी घातलेली आहे. पण त्यानंतर ही टेस्ट करण्यात आल्यानं महिला अधिकाऱ्याला धक्का बसला. याबाबत त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. या महिलेसोबत कोईम्बतूर येथील हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयात त्यांच्या खोलीत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com