Amit Shah : 'राम मंदिर झाले आता सीता मातेचे मंदिर उभारणार', अमित शाहांची मोठी घोषणा

Amit Shah Big Announcement rand Sita Mata Temple to Be Built : गांधीनगरमध्ये ‘शाश्वत मिथिला महोत्सव 2025’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमित शाह उपस्थित केले.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah News : गुजरातमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जाहीर केले की मिथिलामध्ये लवकरच सीता मातेचे भव्य मंदिर उभारले जाईल, जे संपूर्ण जगाला नारी शक्तीचा संदेश देईल. त्यांनी गुजरातच्या विकासामध्ये मिथिलांचल आणि बिहारच्या लोकांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी असेही सांगितले की या प्रदेशाचा प्राचीन काळापासूनच लोकशाही आणि तत्त्वज्ञानाच्या सशक्तीकरणात महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

गांधीनगरमध्ये ‘शाश्वत मिथिला महोत्सव 2025’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी सीता मातेचे मंदिर उभारणार असल्याचे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी वचन दिले की लवकरच सीता मातांचे भव्य मंदिर उभारले जाईल.

अमित शाह हे लोकसभा निवडणुकीदरम्यान जेव्हा ते बिहारमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी राम मंदिर उभारले गेले आहे, आता सीता मातांचे भव्य मंदिर उभारण्याची वेळ आली आहे, असे सांगितले होते.

Amit Shah
Mahayuti women leaders on Satej Patil : ''..आता सतेज पाटील आमदारकीचा राजीनामा देणार का?'' महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सवाल!

अमित शाह म्हणाले की, सीता मातेचे मंदिर संपूर्ण जगाला नारी शक्तीचा संदेश देईल आणि जीवन कशाप्रकारे आदर्श बनवावे याचे मार्गदर्शन करेल. संपूर्ण जगासाठी हे मंदिर प्रेरणास्थान ठरेल.

गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या मिथिलांचल आणि बिहारच्या लोकांची स्तुती करताना शाह म्हणाले की, या लोकांनी गुजरातच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सांगितले की मिथिलाची भूमी रामायण आणि महाभारताच्या काळापासूनच बुद्धिजीवींनी समृद्ध आहे. हे प्राचीन लोकशाहीचा जन्मस्थळ आहे.

अमित शाह म्हणाले की, महात्मा बुद्धांनी अनेकदा म्हटले होते की जोपर्यंत विदेह साम्राज्यातील लोक एकत्र राहतील, तोपर्यंत त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. त्यामुळे मिथिलांचल लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी एक प्रेरणादायी शक्ती ठरले आहे. तसेच, शास्त्रार्थाची परंपरा देखील मिथिला भूमीतूनच विकसित झाली आहे. भारतातील सहा प्रमुख तत्त्वज्ञानांपैकी चार तत्त्वज्ञान मिथिलांचलमध्ये जन्मले आहेत.

गुजरातच्या विकासात बिहारींचे योगदान

शाह यांनी सांगितले की, संवादातून समाधान शोधण्याची परंपरा ही मिथिलाच्या भूमीतूनच विकसित झाली आहे. गुजरातच्या विकासामध्ये बिहारच्या, विशेषतः मिथिलावासीयांचे मोठे योगदान आहे.शहांनी गांधीनगरमध्ये त्यांनी ‘शाश्वत मिथिला भवन’ चे उद्घाटन केले आणि महाकवी विद्यापती यांची भव्य प्रतिमा अनावरण केली.

शाह म्हणाले की हे भवन माता सीता, विदुषी भारती, गार्गी आणि मैत्रेयी यांच्या ज्ञान व सामर्थ्याने प्रकाशित मिथिलाची संस्कृती आणि परंपरा जपणारे महत्त्वाचे केंद्र बनेल.

Amit Shah
Shaktipeeth Highway Project : एकाचवेळी तीन तगडे ड्रीम प्रोजेक्ट; लाखोंचे बजेट महायुती सरकारला झेपणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com