Amit Shah News : समान नागरी कायद्याबाबत अमित शाहांनी केलं मोठं विधान; म्हणाले, पुढील पाच वर्षांत...

Amit Shah On One Nation One Election : एक देश एक निवडणुकीबाबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात निर्णय घेतला जाईल, असं अमित शाहांनी सांगितलं आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Delhi News, 27 May : समान नागरी कायद्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. पुन्हा सत्तेत आल्यास सर्व पक्षांशी विचारविनिमय करून समान नागरी कायदा लागू केला जाईल, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नेतृत्वात एक देश, एक निवडणुकीची अंमलबजावणी केली जाईल, असंही गृहमंत्री शाह म्हणाले.

समान नागरी कायदा ( Uniform Civil Code ) ही एक मोठी सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक सुधारणा आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वी अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबत भाष्य केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमित शाह ( Amit Shah ) म्हणाले, "समान नागरी कायदा ही जबाबदारी घटनाकारांनी आपल्यावर सोपवली आहे. धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा, असं घटनाकारांनी सांगितलं होतं. त्यामुळेच समान नागरी कायदा असणं आवश्यक आहे. समान नागरी कायदा ही एक मोठी सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक सुधारणा आहे."

Amit Shah
Nitish Kumar On Narendra Modi : आकड्यांच्या गोंधळानंतर आता मोदींच्या पदाचाही घोळ; नितीशकुमार नेमके काय म्हणाले?

"उत्तराखंड सरकारनं समान नागरी कायद्याबाबत केलेल्या सामाजिक आणि कायदेशीर बाबींची छाननी व्हायला हवी. धार्मिक नेत्यांचेही सल्ले महत्वाचे आहेत. या चर्चेनंतर आदर्श कायद्यात काही बदल करावे लागतील. न्यायपालिकेचं मतही समोर येईल. त्यानंतर देशाच्या कायदेमंडळानं आणि संसदेनं यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे. हा कायदा नक्कीच झाला पाहिजे. संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा लागू करणं हे भाजपचं ध्येय आहे. पुढील पाच वर्षांत ते ध्येय पूर्ण होईल," असं अमित शाहांनी सांगितलं.

Amit Shah
Kapil Sibal vs Modi : 'मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे महिलांचा अपमान' ; कपिल सिब्बलांचा आरोप!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com