
New Delhi : लोकसभेत मंगळवारी एक देश एक निवडणूक हे विधेयक सादर करण्यात आले. त्यासाठी झालेल्या मतदानावेळी भाजपचे जवळपास 20 खासदार गैरहजर होते. त्यामुळे विधेयकाच्या बाजूने केवळ 269 मते पडली. ही बाब पक्षाने गांभीर्याने घेतली असून गैरहजर राहिल्याने खासदारांना नोटीस बजावली. त्यानंतर खासदारांकडून त्याला उत्तर देताना अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यात महाराष्ट्रातील खासदारही आहेत.
'एक देश एक निवडणूक' हे मोदी सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक आहे. हे विधेयक संसदेत पारित करण्यासाठी सरकार जोर लावणार असल्याचे स्पष्ट आहे. पण विधेयक सादर केल्यानंतर पहिल्याच दिवशी पक्षाला खासदारांनीच झटका दिला. त्यामुळे विधेयकावर झालेल्या मतदानामध्ये सरकारला 272 चा आकडाही गाठता आला नाही.
लोकसभेत मतदानावेळी जवळपास 20 खासदार गैरहजर होते. त्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, चंद्रकात पाटील यांचाही समावेश आहे. तसेच गिरीराज सिंह, भागीरथ चौधरी, जगदंबिका पाल, शांतन ठाकूर, बी. वाय. राघवेंद्र, विजय बघेल, जयंत कुमार रॉय, जगन्नाथ सरकार आदींचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही यावेळी गैरहजर होते, असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.
दांडी मारलेल्या खासदारांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर त्यांच्याकडून अनेक कारणे सांगितली जाऊ लागली आहे. पाटील आणि चौधरींसह काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजस्थान येथील कार्यक्रमात होतो, असे सांगितले आहे. तर काही खासदारांनी वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. काही खासदारांनी अनुपस्थितीबाबत पक्षाला आधीच कळवले होते.
खासदारांकडून कारणे सांगितली जात असली तरी भाजपने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून त्याची पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. मित्रपक्षांच्या चार-पाच खासदारांनी मतदानावेळी गैरहजेरी लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचेही समर्थन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.