Parliament Winter Session : संसदेत घुमला 'जय भीम'चा नारा; भाजपचा काँग्रेसवर प्रहार, गोंधळामुळे कामकाज तहकूब

Amit Shah statement on Babasaheb Ambedkar : अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना आंबेडकरांचे नाव घेण्याची आता फॅशन झाली आहे, असे विधान केले होते.
Congress Protest
Congress ProtestSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेसह राज्यसभेतही ‘जय भीम’चा नारा घुमला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून त्यांनी माफी मागण्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रहार केला. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

संविधानावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावर काँग्रेस जोरदार आक्षेप घेतला आहे. आजकाल आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे. देवाचे नाव घेतले असते तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे विधान शाह यांनी केले होते.

शाह यांच्या या विधानावरून राजकारण तापले आहे. बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘जय भीम’चा नारा देण्यास सुरूवात केली. शाह यांनी माफी मागण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यानंतर लोकसभेत केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल आणि राज्यसभेत किरण रिजिजू यांनी शाह यांच्या विधानाचे समर्थन करत काँग्रेसवर हल्ला चढवला.

Congress Protest
MP Varsha Gaikwad : 'तरी बाबासाहेब नेहमीच "फॅशन"मध्ये राहतील'; खासदार गायकवाडांचा अमित शाह यांना इशारा

आंबेडकर असताना काँग्रेसने त्यांचा कधीच सन्मान केला नाही. त्यांचा निवडणुकीत पराभव केला. संसदेत येऊ दिले नाही आणि आता त्यांचे फोटो संसदेत आणत आहेत. त्यांना भारतरत्नही भाजपच्या सरकारने दिले, अशी टीका केंद्रीय मंत्र्यांनी केली. यादरम्यान विरोधकांची नारेबाजी सुरूच होती. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Congress Protest
Amit Shah : महाराष्ट्रात ‘त्या’ चुकीमुळे महाविकास आघाडीचा पराभव! शहांनी राज्यसभेत सांगितले कारण…

संसदेच्या आवारात आंदोलन

अमित शाह यांच्या विधानाविरोधा विरोधकांनी संसदेच्या आवारातही आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस व इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते. सर्वांनी हाता आंबेडकरांचे फोटो घेत शाहांनी माफी मागावी, अशा घोषणा देण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com