Rahul Gandhi News : राहुल गांधींचे सर्वात मोठे दोन आरोप आयोगाने खोडून काढले, नोटीसही धाडली: शकुन राणी प्रकरण अंगलट येणार?

Rahul Gandhi’s Allegation of Double Voting Against Shakoon Rani : निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना पाठविलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, शकुन राणी यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी दोनदा मतदान केल्याचा दावा फेटाळला आहे.
Election Commission refutes Rahul Gandhi’s double voting claim against Shakoon Rani and issues notice
Election Commission refutes Rahul Gandhi’s double voting claim against Shakoon Rani and issues notice Sarkarnama
Published on
Updated on

Election controversy India : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मतदारयाद्यांमधील घोळावरून भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. दोनदा मतदान, तीन राज्यांत मतदारनोंदणी, चुकीचे पत्ते, नावे असे अनेक दावे त्यांनी केले होते. त्यासाठी मतदारयाद्या व इतर कागदपत्रे दाखवत त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचेही ठामपणे सांगितले होते. आयोगाने मात्र हे दावे खोडून काढले आहेत.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका शकुन राणी या महिला मतदाराने दोनदा मतदान केल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या मतदारयादीतील त्यांचे नाव आणि मतदान केल्याची खून असल्याचे काही पुरावे असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे दुबार मतदानाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोशल मीडियातही शकून राणी नावाचा ट्रेंड सुरू झाला होता.

कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल यांच्या दाव्यांची दखल घेत शकुन राणी प्रकरणाची चौकशी केली. पण हा आरोप तथ्यहीन असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने आज राहुल गांधींना नोटीस पाठवत त्यांनी कोणत्या कागदपत्रांचे आधारे दुबार मतदानाचे आरोप केले, ती कागदपत्रे देण्याची नोटीस पाठविली आहे. जेणेकडून त्याची चौकशी करता येईल, असे आयोगाने नोटिशीत म्हटले आहे.

Election Commission refutes Rahul Gandhi’s double voting claim against Shakoon Rani and issues notice
Election Commission : मोदींचे खासमखास उपमुख्यमंत्री 2 मतदारसंघात मतदार! निवडणूक आयोगाचा 'तेजस्वी' कारभार पुन्हा उजेडात

आयोगाने राहुल यांना पाठविलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, शकुन राणी यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी दोनदा मतदान केल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच तुम्ही पत्रकार परिषदेत मतदान केल्याची खूण असल्याची दाखवलेली कागदपत्रे मतदान अधिकाऱ्यांनी दिलेली नसल्याचे आमच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचेही आयोगाने म्हटले आहे. 

Election Commission refutes Rahul Gandhi’s double voting claim against Shakoon Rani and issues notice
Rahul Gandhi Vote Chori : राहुल गांधींचं फुलप्रुफ प्लॅनिंग; एकामागोमाग एक घाव, ‘वोट चोरी’विरोधात आता नवी खेळी

आयोगाक़डून डिजिटल मतदारयाद्या दिल्या जात नसल्याचा आरोपही खोडून काढण्यात आला आहे. कोणतीही व्यक्ती, मग तो मतदार असो की कोणताही राजकीय पक्ष त्यांना या लिंकच्या माध्यमातून 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील कोणत्याही मतदार याद्या डाऊनलोड करता येतात. ते स्वत: याची पडताळणी करू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना अंतिम मतदायाद्या डिजिटल माध्यमातूनही उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com