Chandrababu Naidu : जिथं पक्षाची स्थापना, तिथंच चंद्राबाबूंची दयनीय स्थिती! पुन्हा भरला हुंकार...

Telangana Telgu Desam Party Andhra Pradesh : चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी हैद्राबाद येथे तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama
Published on
Updated on

Hyderabad : तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबू नायडू यांनी आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. लोकसभेसह विधानसभेतही त्यांच्या तेलुगू देसम पक्षाला मतदारांनी भरभरून साथ दिली. पण जिथं पक्षाची स्थापना झाली, त्याच राज्यात टीडीपीची दयनीय अवस्था झाली आहे.

सुमारे 40 वर्षांपुर्वी टीडीपीची स्थापना हैद्राबाद म्हणजे आजच्या तेलंगणा राज्यात झाली होती. या राज्यात पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी नाही. विशेष म्हणजे पक्षाला मागील काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षही नाही. त्यामुळे राज्यात टीडीपी आहे की नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

आंध्र प्रदेशात सत्ता मिळाल्यानंतर चंद्राबाबू नायडू शनिवारी पहिल्यांदाच तेलंगणामध्ये आले. त्यानंतर त्यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाला तेलंगणामध्ये पुन्हा पूर्वीचे दिवस आणणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Chandrababu Naidu
Rahul Gandhi : राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पहिलं पत्र; म्हणाले, ...तर तुम्हाला सहकार्य करायला मी तयार!

 तेलंगणामध्ये पक्षाचा जन्म झाला, लवकरच पुनर्बांधणी केली जाईल, असे नायडूंनी स्पष्ट केले. पक्षाने मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक आणि लोकसभेची निवडणूकही लढवली नाही. विधानसभा निवडणुकीआधीच कसानी ज्ञानेश्वर यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले. तेव्हापासून हे पद रिक्त आहे.

नायडू म्हणाले, तेलुगू लोकांसाठ टीडीपीचा जन्म झाला. त्यामुळे हा पक्ष तेलंगणामध्ये असायलाच हवा. तेलंगणामध्ये आपला पक्ष असायला हवा की नको? पक्षासाठी अनेक लोकं काम करत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच पक्षा पूर्वीचे दिवस आणू. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे माझे दोन डोळे असल्याचे विधानही नायडूंनी केले.

Chandrababu Naidu
Video Rahul Gandhi : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी ठोकला शड्डू, म्हणाले, विधानसभेला...

दरम्यान, शनिवारी नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही राज्यांमुळे काही संयुक्त प्रश्नांबाबत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीबाबत बोलताना नायडूंनी भविष्यात अशीच चर्चा सुरू राहील, असा आशावाद व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com