सदावर्ते-परब आमने-सामने : मेस्मा कायद्याने पाडला दोन वकिलांच्या अभ्यासाचा किस

हा कायदा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू होतो की नाही यावर दिवसभर खल झाल्यानंतर हा अत्यावश्यक सेवेचा कायदा एसटी कर्मचाऱ्यांना लागू होतो असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहे. तसेच हा कायदा लावायचा का? यावर शासन गंभीरतेने विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या कारवाईत कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल परब म्हणाले, आज काही माध्यमांनी एसटी अत्यावश्यक सेवेत येत नसल्याचे सांगितले. पण हे चुकीचे आहे. माहिती अधिकारात मागविलेली माहिती आणि दिलेली माहिती यात तफावत असू शकते. तालुका ते गाव हे जोडण्याचे काम एसटी करते. त्यामुळे एसटी हि अत्यावश्यक सेवेत येते, आणि त्यांना मेस्मा कायदा लागू होतो, असेही परब म्हणाले.

Gunaratna Sadavarte
सतेज पाटलांचा विजयी रथ सुसाट : जिल्हा बँकेत बिनविरोध

दूसऱ्या बाजूला याच मेस्मा कायद्यावरुन अनिल परब आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. परब यांच्या मेस्माच्या इशाऱ्यानंतर विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मेस्मा लागत नाही असे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी परब यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सदावर्ते यांनी अनिल परब यांच्या कायद्याच्या अभ्यासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ते म्हणाले, माणसं डिग्री घेतात मात्र कायद्याचा त्यांनी किती अभ्यास केला हा मोठा प्रश्न आहे. मेस्माचा माझा अभ्यास आहे, आणि जो पर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना मेस्मा लागत नाही. यातून सरकार एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार करत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला.

Gunaratna Sadavarte
नारायण राणेंची सुरक्षा वाढवली : कोकणातील अटकेनंतर धोका वाढला

मी अर्णब गोसावी किंवा अभिनेता, अभिनेत्री

अॅड. सदावर्ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेचा मी अभ्यासक आहे, जो पर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना मेस्मा लागत नाही. गुन्हे दाखल होणार त्यामुळे कर्मचारी घाबरले आहेत. तुमच्या या विधानामुळे लोकांचे जीव जातात. ह्यासाठी मी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. अनिल परब भीती निर्माण करत आहेत पण मी अर्णब गोसावी किंवा अभिनेता, अभिनेत्री नाही असा टोलाही सदावर्तेंनी अनिल परबांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com