C Voter Survey : छत्तीसगडमध्ये भाजपला पुन्हा धक्का, काँग्रेसच बाजी मारणार !

Chhattisgarh Election C Voter Survey : 18 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
C Voter Survey :
C Voter Survey :Sarkarnama
Published on
Updated on

C Voter Survey : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या राजकीय वातावरणात सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी छत्तीसगडचे सर्वेक्षण जाहीर केले आहे.

सर्वेक्षणाच्या निकालानुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. 18 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशात पंतप्रधानपदासाठी छत्तीसगडच्या जनतेने आपली पहिली पसंती कोण आहे, याचाही कौल दिला आहे.

C Voter Survey :
Omraje On Talathi Bharti : सरकारने डोके ठिकाणावर आणावे : तलाठी परीक्षेतील गोंधळामुळे ओमराजे निंबाळकर भडकले !

छत्तीसगडमध्ये यावेळी कोणाचे सरकार?

छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या या ओपिनियन पोलनुसार छत्तीसगडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणानुसार, छत्तीसगडमधील एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला 46 टक्के मतांसह सर्वाधिक 48-54 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 41 टक्के मतांसह 35-41 जागा मिळू शकतात. तर इतरांना 13 टक्के मतांसह 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहेत.

पंतप्रधानांची पहिली पसंती कोण?

या ओपिनियन पोलनुसार छत्तीसगडच्या जनतेलाही पंतप्रधानांच्या पहिल्या पसंतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यानुसार, ६२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी आपली पहिली पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर २० टक्के लोकांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नावाला पंसती दिली आहे. तर ६ टक्के लोकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नावाला पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे. त्याचबरोबर ३ टक्के लोकांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी यांचे नाव घेतले.तर 9 टक्के लोकांनी इतर नावांना पसंती दिली आहे.

C Voter Survey :
Bead Politics : बीड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत वाद वाढला ? हेवेदावे करण्यातच पदाधिकारी व्यस्त

PM मोदींच्या कामावर जनतेचा कौल ?

या ओपिनियन पोलमध्ये पीएम मोदींच्या कामावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी 64 टक्के लोकांनी ते पंतप्रधानांच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर 16 टक्के लोकांनी कमी समाधानी तर 15 टक्के असमाधानी असल्याचे मत दिले आहे. तर ५ टक्के लोकांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.

मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोणाला?

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी पहिल्या पसंतीबाबतही विचारण्यात आलेल्या प्रश्नावर, सर्वेक्षणात सहभागी 49 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाच पहिली पसंती दिली आहे. तसेच, 24 टक्के लोकांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही नावाला पसंती असल्याचे म्हटले आहे.तर 13 टक्के लोकांनी टी.एस. सिंहदेव आणि 14 टक्के इतरांनी नावे सांगितली आहेत.

C Voter Survey :
CM Bhupesh Baghel Snake Incident: मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत साप घुसल्याने मोठा गोंधळ; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेशातही सर्वेक्षण

छत्तीसगडच्या ओपिनियन पोलसोबतच मध्य प्रदेशचेही सर्वेक्षण करण्यात आले. यात 1964 जणांनी भाग घेतला होता. मध्यप्रदेशातील 39 जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? सर्वेक्षणात सहभागी लोकांपैकी ५६ टक्के लोकांनी भाजपचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. तर २८ टक्के लोकांनी ते चुकीचे असल्याचे म्हटलं. तर 16 टक्के लोकांनी माहित नाही, असं सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com