
New Delhi News : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच दिल्लीतील राजकीय हवा चांगलीच तापली आहे. निकालाला काही तासंच उरलेले असताना अनेक घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप गंभीर आरोप केल्यानंतर अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट केजरीवालांचे घर गाठले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
दिल्लीत मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर केजरीवालांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला. आपच्या 16 उमेदवारांना भाजपने मंत्रिपद आणि पक्ष बदलण्यासाठी 15-15 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न मिळाल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.
केजरीवालांच्या या आरोपांनंतर भाजपने आज थेट नायब तहसीलदारांना पत्र लिहून केजरीवालांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. केजरीवालांचे आरोप निराधार असून भाजपची प्रतिमा खराब करणारे आहेत. दिल्लीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे आरोप केल्याचे भाजपने पत्रात म्हटले आहे.
भाजपच्या या पत्रानंतर नायब राज्यपालांच्या प्रमुख सचिवांनी थेट एसीबीला या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच एसीबीची टीम केजरीवालांसह आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहचली आहे. तर संजय सिंह यांनीही थेट एसीबीचे कार्यालय गाठले आहे. त्यामुळे सध्या दिल्लीती राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे एसीबीकडून आपच्या अनेक नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांचीही झाडाझडती एसीबीकडून घेतली जाऊ शकते. त्यामुळे निकालाच्या काही तास आधीच दिल्लीत आपच्या उमेदवारांना चौकशीला सामोरे जावे लागेल. एसीबीच्या चौकशीतून काय निष्पन्न होणार, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.