दहा तास वाट पाहिली... पण अमित शहा भेटलेच नाहीत!

अपर्णा यादव (Aparna Yadav) यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या भेटीगाठी अद्याप सुरू
Aparna Yadav
Aparna Yadav
Published on
Updated on

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav) यांची सून अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने भाजप स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. त्याचवेळी मात्र गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी अपर्णा यादव यांना आणखी वाट पाहवी लागणार आहे.कारण एक दोन नव्हे तब्बल दहा तास वाट पाहूनही अमित शहांची काल भेट झाली नाही.

भाजपचे सदस्यत्त्व स्वीकारल्यानंतर अपर्णा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, (J P Nadda) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. परंतु अमित शहांची भेट होऊ शकली नाही. पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपर्णा यांना शहा यांची भेट घेण्यासाठी दहा तास वाट पाहवी लागली. तरीही भेट होऊ शकली नाही. त्यांना भाजप मुख्यालयातून न भेटताच परतावे लागले.

Aparna Yadav
UP Election : शहा येताच बदलली रणनीती : भाजपच्या 50 आमदारांची तिकिटे वाचली

गृहमंत्री विधानसभा निवडणुकीत व्यग्र असल्याने अपर्णा यादव यांना वेळ देऊ शकले नाहीत, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. परंतु राजकीय वर्तुळात अपर्णा यादव यांना वाट पाहवी लागल्याबद्धल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी म्हटले की, आपण नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित झालो आहोत. आता देशसेवेसाठी बाहेर पडले आहे. स्वच्छ भारत मिशन, महिलांसाठी स्वावलंबी जीवन यासह भाजपच्या अनेक योजनांची आपल्यावर छाप पडली असल्याचेही अपर्णा म्हणाल्या.

Aparna Yadav
संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

यूपी फिर मांगे बीजेपी सरकार’
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या नव्या प्रचारगीताचे उद्‌घाटन केले. ‘यूपी फिर मांगे बीजेपी सरकार’ अशा ओळी असलेल्या या गाण्याच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी पक्ष मुख्यालयात केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा हे दोघे उपमुख्यमंत्री, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसारच राज्य सरकारचे काम सुरु आहे. कोणत्याही विशिष्ट समाजाचे लांगुलचालन न करता आम्ही सर्वांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या सत्ताकाळात अनेक साखर कारखाने बंद पडले होते आणि अनेक वर्षे शेतकऱ्यांना ऊसाचे पैसेही मिळाले नव्हते. आमच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी प्रमाणात पैसे मिळवून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com