Parliament Session 2025 : संविधानातून 'धर्मनिरपेक्षता' आणि 'समाजवाद' शब्द हटवणार? केंद्रीय मंत्र्याने संसदेत खरं काय ते सांगून टाकलं

Arjun Meghwal Secularism Socialism Constitution : संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरेपक्षता आणि समाजवाद हे दोन शब्दांचा 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आला होता.
Union Minister Arjun Meghwal addresses media, confirms no move to remove secularism or socialism from the Constitution.
Union Minister Arjun Meghwal addresses media, confirms no move to remove secularism or socialism from the Constitution.sarkarnama
Published on
Updated on

Arjun Meghwal News : संविधानाच्या प्रस्तावनेत असलेल्या धर्मनिरपेक्षता तसेच समाजवाद हे शब्द हटवण्याचे मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसाबळे यांनी केली होती. त्यामुळे हे दोन्ही शब्द केंद्र सरकार हटवणार अशी चर्चा सुरू झाली होती. संसदेच्या अधिवेशनात याविषयी लेखी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल यांनी राज्यसभेत उत्तर देताना स्पष्ट केली की, 'समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द संविधानातून हटवण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नाही तसेच या शब्दांवर पुर्नविचार देखील करण्यात येणार नाही.'

मेघवाल यांनी सांगितले की, हे शब्द बलण्याची चर्चा राजकीय आहे. केंद्र सरकारकडून असा कोणताही निर्णय घेतला नाही किंवा तसा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. हे दोन्ही शब्द 1976 च्या आणीबाणी दरम्यान संविधानाच्या प्रस्तावनेत जोडले गेले होते.

Union Minister Arjun Meghwal addresses media, confirms no move to remove secularism or socialism from the Constitution.
Manipur violence : मणिपूरमधील परिस्थिती जैसे थे! राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवली, अमित शाह प्रस्ताव मांडणार

संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरेपक्षता आणि समाजवाद हे दोन शब्दांचा 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आला होता. भाजप नेत्यांकडूनही भारताच्या संस्कृतीत धर्मनिरपेक्षता आहेच पण संविधानाच्या प्रस्तावनेत तो शब्द घुसडण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जेंव्हा हा वाद निर्माण झाला होता तेव्हा या दोन्ही शब्दांचा पुर्नविचार करायला हवा असे म्हटले होते.

Union Minister Arjun Meghwal addresses media, confirms no move to remove secularism or socialism from the Constitution.
Manikrao Kokate : कोकाटे मंत्री राहतील पण..., अजितदादांच्या 'वॉर्निंग'नंतर फडणवीस अन् तटकरेंच्या बैठकीत प्लॅन ठरला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com