Manikrao Kokate : कोकाटे मंत्री राहतील पण..., अजितदादांच्या 'वॉर्निंग'नंतर फडणवीस अन् तटकरेंच्या बैठकीत प्लॅन ठरला!

Manikrao Kokate Rummy Controversy : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Jul : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची 'रमी' गेमने चांगलीच गोची केली आहे. विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.

कारण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता थेट कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. रमी व्हिडिओच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

अशातच आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाली झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या बैठकीत माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, असल्याची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्यांही सूत्रांची सांगितलं आहे. त्यामुळे आता नेमकी खांदेपालट काय केली जाणार आणि कृषी खातं कोणाकडे दिलं जाणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
Rahul Gandhi Bail: राहुल गांधींचा नाशिक दौरा टळला, सावरकर अवमान प्रकरणात जामीन मंजूर!

कोकाटेंच्या पाठीशी कोणीच नाही

माणिकराव कोकाटे यांचं कृत्य सरकारसाठी भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटेंबाबत निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, प्रत्येकाने भान ठेवून वागलं आणि बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
"झाले एवढे बस झालं... किमान आता तरी" : मृत हर्षद पाटीलच्या भावाची उद्विग्न प्रतिक्रिया

इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका हे मी यापूर्वीच सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन." दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे आता कोकाटेंचे मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com