Manipur violence : मणिपूरमधील परिस्थिती जैसे थे! राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवली, अमित शाह प्रस्ताव मांडणार

Manipur President's rule extended for 6 months : मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे तिथे केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अशातच आता या राज्यातील राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Amit Shah On Manipur President Rule
Amit Shah On Manipur President RuleSarkarnama
Published on
Updated on

Manipur: President's rule extended for six months : मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे तिथे केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अशातच आता या राज्यातील राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याबाबत शुक्रवारी (ता.25) राज्यसभेत एक प्रस्ताव मांडणार असून या प्रस्तावात ते मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्याबाबत संसदेची मंजुरी घेतील.

प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर 13 ऑगस्ट 2025 पासून लागू केला जाणार आहे. राज्यसभेने जारी केलेल्या नोटीसमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये लिहिलं आहे की, गृहमंत्री अमित शहा दिलेल्या ठरावाची सूचना स्वीकारण्यात आली आहे.

तर हे सभागृह 13 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरच्या संदर्भात भारतीय संविधानाच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपतींनी जारी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीला 13 ऑगस्ट 2025 पासून पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता देत असल्याचंही यात नमुद केलं आहे. त्यामुळे आता आणकी सह महिने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असणार आहे.

Amit Shah On Manipur President Rule
Manikrao Kokate : कोकाटे मंत्री राहतील पण..., अजितदादांच्या 'वॉर्निंग'नंतर फडणवीस अन् तटकरेंच्या बैठकीत प्लॅन ठरला!

दरम्यान, मणिपूरमधील परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाही, या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करू शकतात. कारण सरकारला या राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात अपयश आल्यामुळेच इथे पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जात असल्याचं बोललं जात आहे.

Amit Shah On Manipur President Rule
Vice President election : ना नितीश कुमार, ना ठाकूर... उपराष्ट्रपतीपदी भाजपचाच नेता; मोदी-शहांची स्ट्रॅटेजी

मे 2023 मध्ये सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी गटांमधील हिंसाचारात आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झालेत. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर, केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com