Arvind Kejriwal: अभिजीत दिपकेंना विमानातून ताब्यात घेण्यावरुन केजरीवाल भडकले; सरकारला दिला मोठा इशारा

Arvind Kejriwal criticised the government after CJP founder Abhijeet Dipke was detained: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानातून ताब्यात घेतल्याच्या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. दिल्लीतील आंदोलनादरम्यान केजरीवाल आणि इतर विरोधी नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
Arvind Kejriwal criticised the government
Arvind Kejriwal criticised the governmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi CJP Protest: देशभरात सध्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांना दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंसह सौरभ दास, आशुतोष रांका यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. यावरुन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनाही आता दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

दिल्लीत य़ेणाऱ्या रेल्वे या रद्द करण्यात आल्या असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विरोधी नेत्यांसह आंदोलकांना दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. सकाळी केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले होते की, “हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. यावरुन आता अधिकृत झाले आहे की, आपण मोदींच्या संपूर्ण हुकूमशाहीखाली जगत आहोत. कॉकरोचांना थेट विमानातून अटक करणे हे सरकारच्या भीतीची अभूतपूर्व पातळी दाखवते.”

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणुकीत मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला. ते केवळ मतांची चोरी करूनच निवडणुका जिंकू शकतात, असा दावाही त्यांनी केला. केजरीवाल म्हणाले की, “पंतप्रधान मोदींना चांगलेच माहीत आहे की, ते केवळ मतांची चोरी करूनच निवडणुका जिंकले. आता आपली फसवणूक लपवण्यासाठी ते लोकशाही पूर्णपणे चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.

Arvind Kejriwal criticised the government
Abhijit Dipke : दिल्लीत विद्यार्थ्यांच आंदोलन, ते काय चंबलचे डाकू आहेत का? मग एवढे पोलीस कशासाठी? अभिजीत दिपकेला ताब्यात घेताच कुटुंबियांचा सवाल

केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

सकाळी केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आप पक्षाने व्यक्त केली होती.अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनात भाग घेत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.मात्र दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्यासह संजय सिंह आणि आपच्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सरकारवर टीका करत ते म्हणाले की, भारताचा युवा आता जागा झाला आहे, मोदी यांची हुकुमशाही आता चालणार नाही."

Arvind Kejriwal criticised the government
Raj Thackeray : मोदी, शहा यांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही, ती उखडूनंच टाकली पाहिजे; राज ठाकरेंचा संताप

दिल्ली पोलिसांकडून आतापर्यंत युट्यूबर ध्रुव राठी, अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष राणा यांच्याबरोबरच सीजेपीच्या विविध कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तृणमूल ममता पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com