Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे विधान; म्हणाले ‘आघाडीच्या राजकारणामुळेच कॉंग्रेस पक्षाचे नुकसान’

Congress News : आघाडी आणि युतीसंदर्भात विधानसभा, लोकसभेच्या वेळी मोठा गोंधळ झाला होता. त्याची किंमत सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागली आहे.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Karad, 10 may : गेल्या काही वर्षांत राज्यात आणि देशात युती आणि आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता होती. अजूनही ती संपलेली नाही. मात्र, या आघाडीच्या राजकारणामुळे देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायचे की आघाडी करायवी, याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घ्यावा, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यातील कऱ्हाड (स्व.) येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी हे विधान केले आहे. त्यांच्यासोबत युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस रणजीत देशमुख, राजेंद्र शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले, आघाडीच्या राजकारणामुळे देश आणि महाराष्ट्राच्या पातळीवर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले. आघाडी आणि युतीसंदर्भात विधानसभा, लोकसभेच्या वेळी मोठा गोंधळ झाला होता. त्याची किंमत सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागली आहे.

Harshvardhan Sapkal
Dr. Shirish Valsangkar : डॉ वळसंगकर आत्महत्या प्रकरण : 'या' मुद्यांवर चौकशीसाठी पोलिसांना हवीय मनीषा मुसळे मानेची पुन्हा कोठडी

सध्या राज्यात सहा राजकीय पक्ष असून यापूर्वी असे कधीही नव्हते. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जे पक्ष बरोबर येतील, त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न राहणार आहे. राजकीय उत्तरदायित्व समजून काँग्रेस पक्ष एकटाही लढायला तयार आहे, असेही हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केले.

युती आणि आघाडीसंदर्भात विधानसभा लोकसभेला गोंधळ निर्माण झाला. त्याची किंमत सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागली. सध्या सहा राजकीय पक्ष राज्याच्या पटलावर आहेत. यापुर्वी ते कधीही नव्हते. वैचारिक लढाई आणि संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. पक्षांतर्गत मोठे बदल येत्या काही दिवसांत दिसतील. काँग्रेसने २०२५ हे वर्ष संघटनात्मक वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यातंर्गत संघटनेत आवश्यक ते फेरबदल, दुरुस्त्या करण्यात येतील.

Harshvardhan Sapkal
NCP Unification News : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत पवारांच्या निकटवर्तीय आमदाराचा मोठा दावा; सर्व प्रक्रियाच उलगडून सांगितली

पृथ्वीराजबाबांच्या वक्तव्याचे राजकारण केलं जातंय

पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य विनाकारण तोडून मोडून दाखवण्यात येत आहे. त्यांचे म्हणणे नीट समजून घेण्याची गरज आहे. चव्हाण यांच्या वक्तव्याचे राजकारण केले जात आहे, ही वेळ राजकारणाची नाही. या वेळी एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर सर्वांनी कसे वागू नये, याचे उदाहरण घालून दिलेले आहे, त्यामुळे याचे राजकारण करू नये. सरकार आणि लष्करासोबत राहण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com