Suresh Gopi : अ‍ॅक्टिंगसाठी परवानगी द्या! मंत्र्यांच्या विनंतीला अमित शाहांचा रेड सिग्नल, अभि’नेत्या’ची सेटवरच सेटिंग...

Amit Shah Union Minister Film Acting : केरळमधून पहिल्यांदाच भाजपच्या तिकीटावर लोकसभेत गेलेल्या सुरेश गोपी यांना मंत्रिपद नकोसे झाले आहे.
Suresh Gopi, Amit Shah
Suresh Gopi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी नेत्यांकडून आकाशपाताळ एक केले जाते. या नेत्याला भेट, त्या नेत्याचा वशिला लाव... अशा उठाठेवी सुरू असतात. पण मनीध्यानी नसतानाही मंत्रिपद मिळालेल्या सुरेश गोपी यांना मात्र हे पदच नकोसे झाले आहे. त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे.

सुरेश गोपी हे अभिनेते आहेत. केरळमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पोहचलेले ते पहिले खासदार. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना बक्षिसी देत केंद्रीय राज्यमंत्री केले. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. परिणामी, चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंधने आल्याने ते व्याकूळ झाले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी मागायला गेल्याची कबुलीही सुरेश गोपी यांनी दिली. पण शाहांनी विनंतीचा तो कागद पाहायलाही नाही, असे खुद्द सुरेश गोपींनीच सांगितले. बुधवारी केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्रिपदावरून आपल्याला हटवले तर मी वाचलो असे समजेन, असे विधान केले आहे.

Suresh Gopi, Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचा नवा डाव कोल्हापुरात महायुतीला धोबीपछाड देणारा?

सुरेश गोपी म्हणाले, ओट्टाकोम्बन या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. पण अद्याप मिळालेली नाही. पण असे असले तरी मी 6 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करणार आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर जवळपास 20 ते 22 चित्रपटांमध्ये काम करण्याची सहमती दर्शवली आहे. अमित शाहांकडे परवानगी मागायला गेल्यानंतर त्यांनी किती चित्रपट आहेत, असे विचारले. मी 22 चित्रपट असल्याचे सांगताच त्यांनी विनंतीपत्र बाजूला ठेवले. पण परवानगी मिळेल, असेही ते म्हणाल्याचे गोपींनी सांगितले.

सेटवर मंत्रालय?

शूटिंगवेळी मंत्रालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी मत्रालयातील तीन-चार अधिकाऱ्यांना सोबत आणणार असल्याचेही सुरेश गोपी यांनी सांगितले. हे अधिकारी मला मंत्रिपदाची कर्तव्य पार पाडण्याची मदत करतील. त्यासाठी चित्रपटाच्या सेटवर विशेष व्यवस्था केली जाईल.

Suresh Gopi, Amit Shah
Punishment in Rape Cases : कोलकातामधील बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी अन्य देशांमध्ये आहेत भयंकर शिक्षा!

मंत्री बनायचे नव्हते

मला कधीही मंत्री बनायचे नव्हते, असोही मंत्रिपद नको असल्याचे सांगताना गोपी म्हणाले, मला मंत्री करण्याच्या त्यांच्या (नेत्यांच्या) निर्णयासमोर मी मान झुकवली. मला ते त्रिशूरच्या लोकांसाठी पद देत असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांचा निर्णय मान्य केला. मी आताही त्यांचे ऐकतो आणि पुढेही ऐकत राहीन. पण चित्रपटांशिवाय मी मरून जाईन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com