Dushyant Chautala : भाजपचा आणखी एक जुना मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; अनेक नेत्यांनी सोडली साथ

Haryana Politics BJP Jan nayak Janata Party : हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांची जननायक जनता पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Dushyant Chautala
Dushyant ChautalaSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : मागील काही वर्षांत भाजपची साथ अनेक मित्रपक्षांनी सोडली आहे. त्यातील काही पक्ष फुटले तर काही कमकुवत झाले. आणखी एक जुना मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. हरियाणातील दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडली असून काही सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाने हरियाणातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर राज्यात भाजपसोबत चौटाला यांनी सत्तास्थापन केली. पण काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपची साथ सोडली. त्यानंतर आतापर्यंत पाच आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत.

Dushyant Chautala
Suresh Gopi : अ‍ॅक्टिंगसाठी परवानगी द्या! मंत्र्यांच्या विनंतीला अमित शाहांचा रेड सिग्नल, अभि’नेत्या’ची सेटवरच सेटिंग...

बिहारमधील चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचीही काही महिन्यांपूर्वीच अशीच स्थिती झाली होती. त्यांच्याही पक्षात फूट पडल्यानंतर चिराग यांच्या विरोधात गेलेले काका पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.

हरियाणात विधानसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्याआधीच चौटाला यांचे पाच आमदार पक्षातून गेले आहेत. यासह इतर काही नेत्यांनीही बाहेर रस्ता धरला आहे. 2019 मध्ये पक्षाने दहा जागा जिंकत किंगमेकरची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे चौटाला उपमुख्यमंत्री बनले. पण लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

Dushyant Chautala
TVK Chief Vijay Unveils Party Flag : हत्तींवर स्वार होत सुपरस्टार थलपती विजय देणार स्टॅलिन यांना टक्कर; झेंडा फडकावत फुंकले निवडणुकीचे रणशिंग

पक्षाची लोकप्रियता कमी होत असल्याने नेते पक्ष सोडत असल्याचे सांगितले जात आहे. चौटाला यांनी आमदारांना पक्षात सर्वाधिक सन्मान दिल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. इतर पक्षांत त्यांना एवढा मान मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत चौटाला आम आदमी पक्षासोबत आघाडी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत आपला राज्यात चांगली कामगिरी करता आली नाही. राज्यातही पक्षाला एकही जागा मिळाली नाही. इंडिया आघाडीमध्ये असूनही त्यांनी पंजाबसह हरियाणातही वेगळी चूल मांडली होती. आता विधानसभेतही चौटाला यांच्यासोबत जात आपकडून काँग्रेस व भाजपला टक्कर दिली जाईल, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com