Election Commission : भाजप शिक्क्याच्या वादानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार; आयोगानं 'BLO'सह बूथवरील सर्व मुस्लिम मतदारांना वगळलं...

Basirhat voter list deletion : सुरूवातीला या मतदारांच्या नावे तात्पुरत्या मतदार यादीमध्ये ‘अंडर अडजुडिकेशन’ असे दर्शवत समाविष्ट केली होती. मंगळवारी पहिली पूरक यादी प्रसिध्द झाल्यानंतर या सर्वांची नावे वगळण्यात आल्याचे दिसून आले.
Basirhat voter list deletion
Basirhat voter list deletion Sarkarnama
Published on
Updated on

West Bengal election controversy : भाजपचा शिक्का असलेले केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यावर आयोगाने ही तांत्रिक चूक असल्याची कबुली दिली होती. तसेच त्यात सुधारणा करण्यात आल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी मतदारयाद्या पुनर्पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. याअंतर्गत आयोगाने नुकतीच पूरक मतदारयादी प्रसिध्द केली. या यादीमध्ये एक बूथवरील सर्व मुस्लिम मतदारांना वगळण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याचे नावही यादीतून वगळले गेले आहे.

बशीरहाट नॉर्थ विधानसभा मतदारसंघातील एका बूथवर हा प्रकार घडला आहे. बूथवरील ३४० मतदारांची नावे यादीतून हटविण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मतदारयादीतून हटविण्यात आलेले सर्व मतदार बोरों गोबरा गावातील बूथ क्रमांक पाचवरील आहे. सर्व मतदार मुस्लिम समाजातील आहेत.

Basirhat voter list deletion
Kerosene supply Maharashtra : गॅस संपला, चिंता नाही; राज्यात 4 शहरे वगळून सर्वत्र मिळणार रॉकेल, सरकारने काढला GR

सुरूवातीला या मतदारांच्या नावे तात्पुरत्या मतदार यादीमध्ये ‘अंडर अडजुडिकेशन’ असे दर्शवत समाविष्ट केली होती. मंगळवारी पहिली पूरक यादी प्रसिध्द झाल्यानंतर या सर्वांची नावे वगळण्यात आल्याचे दिसून आले. त्यामध्ये बूथ लेव्हल अधिकारी मोहम्मद शफिउल आलम यांचाही समावेश आहे. त्यामुळे या परिसरातील मतदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी बीएलओ आणि रस्त्यावरून उतरून या प्रकाराचा विरोध केला. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून ही नावे हटविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बीएलओ आलम यांनी सांगितले की, बशीरहाट ब्लॉक-२ च्या बीडीओशी संपर्क केला पण त्यांनी आता काही केले जाऊ सकत नाही, असे सांगितले.

Basirhat voter list deletion
Assembly Election : ममता बॅनर्जी इतिहास घडविणार की भाजप झटका देणार? ‘ओपिनियन पोल’ने वाढवले टेन्शन

इलेक्टोरल रजिस्ट्रेशन अधिकाऱ्यासी संपर्क होऊ सकला नाही. हे प्रकरण आता ट्रेब्यूनलकडे घेऊन जात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे आलम यांनी स्पष्ट केले. आयोगाने नियमानुसार ११ पैकी किमान एक पुरावा देण्यास सांगितले होते. अनेक लोकांनी ३ ते ४ पुरावे दिले आहेत. पण त्यानंतरही नावे हटविण्यात आल्याचा दावा लोकांकडून केला जात आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com