Political horse trading : वाजपेयींना घोडेबाजाराची होती चीड, त्याच मार्गावर ‘हा’ खासदार; धुडकावली सत्ताधाऱ्यांची कोट्यवधींची ऑफर

MP Amarjit Gill news : अमरजीत गिल यांनी एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन कॅबिनेट मंत्री कमल खेडा यांचा पराभव केला होता.
MP Amarjit Gill, Atal Bihari Vajpayee
MP Amarjit Gill, Atal Bihari VajpayeeSarkarnama
Published on
Updated on

Atal Bihari Vajpayee horse trading : संसदेत १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावरील भाषणादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी सत्तेसाठी खासदारांच्या घोडेबाजाराला पाप म्हटले होते. घोडेबाजाराने बनलेल्या सरकारला मी स्पर्शही करणार नाही, असे म्हणत वाजपेयी विरोधकांवर बरसले होते. अनैतिक मार्गाने येणाऱ्या सत्तेला त्यांनी धुडकावून लावले होते. आजही भारतासह परदेशातही असे लोकप्रतिनिधी आहेत.

सध्या अमरजीत गिल या खासदारांची जगभरात चर्चा होत आहे. त्यांनी अनैतिक सत्तेला धुडकावले आहे. कॅनडात सत्तेत सहभागी होण्याची सत्ताधारी पक्षाची कोट्यवधी रुपयांची ऑफर नाकारत त्यांनी आपल्याच पक्षात राहण्याला पसंती दिली आहे. गिल यांनी स्वत: सोशल मीडियात ही माहिती दिली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाचे सरकार अल्पमतात आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी काही खासदारांची आवश्यकता आहे. त्यासाठी हा पक्षाकडून विरोधी पक्षातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. भारतीय वंशाच्या अमरजित गिल यांनाही तशी ऑफर आली होती. ते प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कंझर्वेटिव्ह पक्षाचे ब्रेम्पटन वेस्ट मतदारसंघाचे खासदार आहेत.

MP Amarjit Gill, Atal Bihari Vajpayee
Ramdas Athawale News : रामदास आठवले जिंकले, पण पक्षावर ओढवली मोठी नामुष्की...

गिल यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, मागील काही आठवड्यांपासून लिबरल पक्ष माझ्याशी संपर्क करत आहे आणि माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत आहे. पण या प्रस्तावाला धुडकावून लावले आहे. मी नेहमीच माझ्या मतदारसंघाच्या विश्वासाचा सन्मान करेन. त्यांचा मजबूत आवाज म्हणूनच मला तिथे पाठविले आहे. त्यासाठी मी कटिबध्द असेन, असे गिल यांनी म्हटले आहे.   

MP Amarjit Gill, Atal Bihari Vajpayee
Mahapalika Election : क्या व्हिक्टरी है यार..! मोदींच्या मंत्र्यांची फडणवीसांना कडकडून मिठी; शिंदे, अजितदादांना न भेटताच परदेशात

दरम्यान, गिल यांनी एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन कॅबिनेट मंत्री कमल खेडा यांचा पराभव केला होता. ते पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. गिळ हे मुळचे भारतातील इंदौर शहरातील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षातील दोन खासदारांनी सत्ताधाऱ्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर गिल यांच्या निष्ठेची चर्चा होत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com