Atique Ahmed Latest News Update : उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) चा साथीदार गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युपी पोलिसांच्या ATS पथकाने गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक केल्याचे सांगितले जात आहे. पण नाशिक पोलिसांनी याबाबत अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
शनिवारी (१५ एप्रिल) आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोन्ही भावांची गोळ्या झाडून हत्या केली. अशरफने मृत्यूपूर्वी गुड्डुचे नाव घेतले होते. गुड्डू मुस्लिम हा तोच व्यक्ती आहे. ज्याने उमेश पालच्या हत्येवेळी एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट घडवून आणले होते. गुड्डू मुस्लिमला गुड्डू द बॉम्बर म्हणूनही ओळखले जाते. असदच्या एन्काउंटरनंतर गुड्डूला पकडण्याची मोहिम आणखी तीव्र झाली होती. त्याच्या एन्काउंटरचीही अफवा पसरली होती, पण नंतर यूपी पोलिसांनी ती फेटाळून लावली होती.
गुड्डू नाशिक मध्ये लपून बसल्याची माहिती युपी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखलही झाले. त्यानुसार युपी पोलिसांच्या पथकाने नाशिकमधुन एकाला अटक केली आहे. पण नाशिक पोलिसांनी मात्र अद्याप गुड्डु मुस्लिमच्या अटकेबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.
कोण आहे गुड्डू मुस्लिम?
गुड्डू मुस्लिमांना ओळखणारे लोक सांगतात की तो पहिल्यापासून बदमाश होता. अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासूनच तो दरोडे, खंडणीसारख्या गुन्हे करत होता. याच काळात तो मोठ्या चोरट्यांच्या संपर्कात आला. तेव्हापासून त्याने बॉम्ब बनवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. रोजच्या गुंडगिरीच्या आणि मारहाणीच्या तक्रारींमुळे व्यथित झालेल्या कुटुंबीयांनी त्याला लखनौला शिक्षणासाठी पाठवले. मात्र तिथेही गुड्डू मुस्लिमाने मोठे गुन्हे करण्यास सुरुवात केली.
एका रिपोर्ट्सनुसार, सर्वात आधी गुड्डू मुस्लिमचे नाव चर्चेत आले ते 1997 मध्ये. गुड्डूने लखनौमधील प्रसिद्ध लमार्टिनियर शाळेतील खेळाचे शिक्षक फ्रेडरिक जे गोम्स यांची हत्या केली होती. याप्रकरणी गुड्डूलाही अटक करण्यात आली होती. गुड्डूसह राजा भार्गव आणि धनंजय सिंह यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. गुड्डूने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूलही केला. मात्र पोलिस तिघांनाही न्यायालयात दोषी सिद्ध करू शकले नाहीत. तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Atique Ahmed Latest news Update)
यादरम्यान गुड्डूने आणखी एका खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने फैजाबादचा कॉन्ट्रॅक्टर संतोष सिंग याचीही हत्या केल्याचे सांगितले होते. गुड्डूने हे देखील सांगितले की त्याने संतोषला विष कसे दिले आणि त्याचा मृतदेह रायबरेलीमध्ये कसा सोडला. यानंतर त्यांची कार, रायफल आणि पैसे लुटले, हे सर्व गुड्डूने पोलिसांना सांगितले होते.
त्यानंतर गुड्डूने विभागातील अधिकाऱ्यांचे अपहरण सुरू केले. त्यांना खुनाची धमकी देऊन टेंडर आपल्या ताब्यात घेत असे. गुन्हेगारीच्या कोणत्याही कामासाठी गुड्डू हे मोठे नाव बनले होते. सरकारी कामांची कंत्राटे कोणाला द्यायची हे त्याच्या एका इशाऱ्यावर ठरवले जायचे. 1997 मध्ये बसपा सरकारच्या काळात राज्य बांधकाम महामंडळाच्या अभियंत्याची रस्त्याच्या मधोमध गुड्डूने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येमध्ये धनंजय सिंगसोबत गुड्डू मुस्लिमलाही आरोपी करण्यात आले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.