Bhopal Gas Tragedy : हजारो लोकांचा तडफडून मृत्यू, 40 वर्षांनंतर हलवला घातक कचरा; रात्रीत लावली विल्हेवाट

Union Carbide Factory hazardous waste disposal Union Carbide factory : भोपाळपासून 250 किलोमीटर अंतरावरील धार जिल्ह्यातील पीथमपूर येथील एमआयडीसीमध्ये हा कचरा नेण्यात आला.
Bhopal Gas Tragedy
Bhopal Gas TragedySarkarnama
Published on
Updated on

Bhopal News : भोपाळमधील गॅस दुर्घटनेच्या भयानक आठवणी बुधवारी रात्री 40 वर्षांनंतर पुन्हा ताज्या झाल्या. शहरातील यूनियन कार्बाइड कंपनीतून 40 वर्षांपूर्वी रात्री विषारी वायूची गळती झाल्यानंतर 5 हजारांहून अधिक जणांचा तडफडून मृत्यू झाला होता. बुधवारीही (ता. 1 जानेवारी) रात्रीच या कंपनीतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अन्यत्र हलवण्यात आला. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.

मध्य प्रदेश सरकारकडून हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जवळपास 337 टन विषारी कचरा 12 सीलबंद कंटेनरमधून हलवण्यात आला आहे. भोपाळपासून 250 किलोमीटर अंतरावरील धार जिल्ह्यातील पीथमपूर येथील एमआयडीसीमध्ये हा कचरा नेण्यात आला. तिथे कचऱ्या विल्हेवाट लावण्यात येणार आहे. भोपाळ गॅस मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक स्वंतत्र कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

Bhopal Gas Tragedy
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांच्या पाठीवर शाबासकीची थाप! कोणत्या कामगिरीवर खूष?

काय घडलं होतं भोपाळमध्ये?

भोपाळमधील यूनियन कार्बाइड कंपनीमध्ये 2-3 डिसेंबर 1984 च्या रात्री अत्यंत विषारी वायू असलेल्या मिथाईल आयसोसायनेटची (एमआयसी) गळती झाली होती. या दुर्घटनेत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच हजारो लोकांना अपंगत्व आले होते. जगभरातील कंपन्यांमधील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक घटना म्हणून याकडे पाहिले जाते. त्यानंतर भोपाळमध्ये लोकांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रयत्न केले गेले. ते आजही सुरूच आहेत.

विषारी कचऱ्याचा प्रश्न होता कायम

कंपनीतील साहित्य म्हणजे विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम होता. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही नुकतेच यूनियन कार्बाइड कंपनीतील साहित्य न हलवण्याप्रकरणी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. चार आठवड्यात हा कचरा न हलवल्यास अवमाननेची कारवाई करण्याचा इशाराही कोर्टाने दिला होता.

Bhopal Gas Tragedy
Ajmer Sharif Dargah: हिंदू सेनेच्या विरोधानंतरही अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी पाठवणार चादर; काय आहे प्रकरण

कशी होणार कचऱ्याची विल्हेवाट?

भोपाळ गॅस दुर्घटना मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पीथमपूर येथील औद्योगिक कचरा प्रकल्पामध्ये सुमारे 337 टन कचरा जाळला जाणार आहे. त्यानंतर कोणताही विषारी घटक उरला आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल. त्यानंतर उरलेली राख पाणी किंवा मातीच्या संपर्कात येणार नाही, यासाठी ती सुरक्षितपणे झाकून ठेवली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निगराणीखाली केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com