Aurangzeb Controversy : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या विधानावरून मंगळवारी विधिमंडळात जोरदार हंगामा झाला. सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षातील आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर आझमी यांनी आपले विधान मागे घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आझमी यांच्या विधानावरून महाराष्ट्रात वाद सुरू असतानाच आता काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनीही वाद ओढवून घेतला आहे. औरंगजेब हा बादशाह होता आणि त्याच्या काळातच भारत अखंड होता, त्याचा सेनापती हिंदू होता, असे विधान मसूद यांनी केले आहे. औरंगजेब उतावीळ नव्हता. एक चित्रपट बनवून इतिहास मिटवला जाऊ शकत नाही, असेही मसूद म्हणाले आहेत.
मीडियाशी बोलताना मसूद म्हणाले, लोकांना योग्य माहिती मिळायला हवी. औरंगजेब हा देशाचा 49 वर्षे बादशाह होता, तो उतावीळ कसा असू शकतो. त्याच्या राज्यात जीडीपी किती होता? बर्मापर्यंत अखंड भारत कुणी बनवला? हे सगळं औरंगजेबाच्या काळात होते, असेही मसूद यांनी म्हटले आहे.
मुघल इथेच जन्माला आले आणि इथेच संपले. त्यांचे वंशज आता बंगालमध्ये भांडी घासून आपले जीवन गत आहेत. इंग्रजांनी भारताला लुटून नेले. बहादुर शाह जफऱच्या दोन्ही मुलांची हत्या त्यांनी आत्मसमर्पण केले नाही, म्हणून करण्यात आली होती. भाजपचे द्वेषाचे राजकारण देशाला कुठे घेऊन जाईल? या राजकारणाने देशाला नुकसाई होईल. 25 कोटी लोकांना बाजूला केले जाऊ शकत नाही, असेही मसूद म्हणाले आहेत.
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. त्यावरून आज विधानसभेसह विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. आझमी यांच्या या विधानानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केली. तसेच त्यांना सभागृहातून बडतर्फ करावे, अशी मागणीही लावून धरण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.