Aviation safety funding : विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर; संसदीय समितीच्या रिपोर्टमध्ये मोदी सरकार निशाण्यावर...

What the Parliamentary Committee Report Reveals : अपघातानंतर पुन्हा हा अहवाल समोर आल्याने सरकारच्या विमान वाहतूक सुरक्षेबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
Parliamentary committee report highlights critical underfunding in DGCA, BCAS, and AAIB following the Ahmedabad Air India crash.
Parliamentary committee report highlights critical underfunding in DGCA, BCAS, and AAIB following the Ahmedabad Air India crash. Sarkarnama
Published on
Updated on

DGCA underfunded : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. संसदीय समितीचा एक अहवाल उजेडात आला असून त्यामध्ये केंद्र सरकारवर ठपका ठेवण्यात आला होता. विमान अपघातांची चौकशी, उड्डाणांची सुरक्षा, नियंत्रण आदी बाबतीत मोदी सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा ठपका या अहवाल ठेवण्यात आला आहे.

संसदीय समितीचा हा अहवाल मार्च महिन्यात राज्यसभेत सादर करण्यात आला होता. अपघातानंतर पुन्हा हा अहवाल समोर आल्याने सरकारच्या विमान वाहतूक सुरक्षेबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. जगात विमान वाहतूकीमध्ये भारत तिसऱ्या क्रमाकांवर आहे.

अहवालानुसार, नागरी विमान वाहतुकीसाठीची सुरक्षा यंत्रणा आणि अपघातांबाबतची चौकशीसाठीची यंत्रणेसाठी केंद्र सरकारकडून केवळ 35 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. ही तरतूद पुरेशी नाही. केंद्राच्या पर्यटन, वाहतूक आणि संस्कृती विभागाच्या या संसदीय समितीने 25 मार्च रोजी हा अहवाल सादर केला होता.

Parliamentary committee report highlights critical underfunding in DGCA, BCAS, and AAIB following the Ahmedabad Air India crash.
Trump global politics : ट्रम्प यांच्या एका सहीनंतर पाकिस्तानला ‘जी हुजूर’ म्हणावंच लागेल; या ट्रॅपमधून आता सुटका नाही...

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA, विमान अपघात चौकशी ब्युरो AAIB आणि नागरी विमान सुरक्षा BCAS या संस्थांसाठी केंद्राकडून देण्यात येणारा निधी पुरेसा नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये डीजीसीएसाठी 30 कोटी, एएआयबी आणि बीसीएएससाठी अनुक्रमे 20 कोटी व 15 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, एएआयबीकडून अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी केली जात आहे. लंडनला जाणारे एअर इंडियाच्या या बोईंग 787 ड्रीमलायनर हे विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये विमानातील 242 पैकी केवळ एकच प्रवासी वाचला आहे. त्याचप्रमाणे इतरांमध्ये पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांसह एकूण 29 जणांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

Parliamentary committee report highlights critical underfunding in DGCA, BCAS, and AAIB following the Ahmedabad Air India crash.
शरद पवार अन् सुप्रिया सुळे यांना राहुल गांधींचा खास 'रिप्लाय'

भारतामध्ये मागील काही वर्षांत विमाने आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातुलनेत संबंधित संस्थांसाठी निधीची तरतुदही वाढणे आवश्यक आहे. त्यातुलनेत आवश्यक सुविधा वाढणेही अपेक्षित असल्याची गरज समितीने अहवाल नमूद केली आहे. तसेच तिन्ही संस्थांमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार डीजीसीएमध्ये तब्बल 53 टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. तर बीसीएएसमध्ये 35 टक्के आणि एएआयमध्ये 17 टक्के जागा रिक्त आहेत. या तिन्ही संस्था विमान वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com