Ayodhya Mosque : मोठी बातमी! राम मंदिरानंतर अयोध्येत आता मशिदीचाही मुहूर्त

Ayodhya Ram Temple : अयोध्येत यावर्षीच मशिदीचीही पायाभरणी होणार
Ayodhya Mosque Plan
Ayodhya Mosque PlanSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya News : अयोध्येत सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच अयोध्येतील मशिदीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येत या वर्षीच्या मे महिन्यात मशिदीचीही पायाभरणी होणार असल्याची माहिती 'रॉयटर' या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अयोध्येतील मशिदीच्या कामावर देखरेख करण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (आयआयसीएफ IICF) या विकास समितीची स्थापना केली आहे. या समितीचे प्रमुख हाजी अरफत शेख यांनी 'रॉयटर'ला सांगितले, 'अयोध्येत (Ayodhya) मे महिन्यापासून भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मशिदीचे काम पूर्ण होण्यासाठी पुढील तीन-चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या नियोजित मशिदीसाठी निधी जमा करण्यासाठी क्राउड-फंडिंग वेबसाइटची स्थापना केली जाणार आहे.'

Ayodhya Mosque Plan
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कारसेवेबाबत राऊतांनी केली चिरफाड; म्हणाले...

शेख म्हणाले, 'प्रेषित मुहम्मद यांच्या नावावरून या मशिदीचे नाव 'मशिद मोहम्मद बिन अब्दुल्ला' ठेवण्यात येणार आहे. लोकांमधील शत्रूत्व, द्वेष संपवून एकमेकांच्या प्रेमात रूपांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण आपल्या मुलांना आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ही सर्व लढाई थांबेल,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अयोध्येतील १६ व्या शतकातील बाबरी मशिद 1992 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यात सुमारे दोन हजार लोक मारले गेले. या वादग्रस्त जागेवरून सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये निकाल दिला. त्यानुसार न्यायालयाने मशिद पाडणे बेकायदेशीर ठरवले. दरम्यान, मशिदीच्या ठिकाणी काही गैर-इस्लामिक संरचना आढळल्याच्या पुराव्यांवरून ही जागा हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी जागा दिली. आता त्या जागी मंदिर (Ram Temple) उभारण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजास मशिद बांधण्यासाठी शहरात इतरत्र जागा देण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार मुस्लिमांना अयोध्येत मशिदी उभारण्यासाठी सुमारे २५ किलोमीटरवर जागा मिळाली. त्या ठिकाणी भव्य अशी मशिद बांधण्याचे नियोजन असून त्यासाठी निधी जमा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार असून पुढील तीन ते चार वर्षांत मशिदीचे काम पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Ayodhya Mosque Plan
Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com