Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कारसेवेबाबत राऊतांनी केली चिरफाड; म्हणाले...

Shivsena Vs BJP Politics: एकनाथ शिंदेंना भाजपचे आदेश मानावेच लागतील
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी संदर्भात कारसेवेत सहभागी झाल्याचा एक फोटो 'एक्स'वर टाकला होता. हा फोटो आणि त्याचा छायाचित्रकार आणि संदर्भ या सगळ्यांची ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी चिरफाड केली. तसेच कारसेवक असल्याचा फडणवीसांचा दावा खोडून काढला.

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये 23 जानेवारील अधिवेशन होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांचा दावा फोल असल्याचे सांगितले.

'फडणवीसांनी कारसेवेबाबत जो फोटो पोस्ट केला आहे, तो फोटो खरा आहे, त्याचा कुठलाही पुरावाच नाही. त्यामध्ये फडणवीस यांच्यासारखा दिसणारी एक व्यक्ती आहे. ते फडणवीस वाटत नाहीत. फडणवीसांनी ज्या छायाचित्रकाराचे नाव सांगितले, ते नवभारत दैनिकात कधीच नव्हते. तर दुसऱ्याच दैनिकात होते आणि तेथूनच ते निवृत्त झाले,' असे पुरावेही राऊतांनी दिले.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Rohit Pawar Secret Blast : पक्षप्रवेशासाठी 'विठ्ठल' बंद पाडण्याची अट घालणारा पुढारी कोण? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

'जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, त्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखा एक मुलगा दिसतो आहे. फडणवीस कारसेवेला गेले असतील तर नागपूरहून बरेच लोकदेखील गेले असतील. मात्र आमच्याशिवाय कोणीच गेले नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. यातून अन्य कारसेवकांचा अपमान झाला आहे. कदाचित ते शतमूर्ख असतील, मात्र मी तसे म्हणणार नाही,' असा चिमटाही राऊतांनी घेतला.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

खासदार राऊतांनी (Sanjay Raut) भाजपचाही समाचार घेतला. 'इव्हेंट करण्यात भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही. अयोध्येच्या कार्यक्रमातून भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. आम्ही सांगू तेच कार्यक्रमाला येतील. सांगू तसाच कार्यक्रम होईल, अशी त्यांची धारणा आहे,' असा घणाघात राऊतांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'श्रीराम सर्वांचे आहेत राम जेवढे आयोध्येत आहेत, तेवढेच नाशिकच्या पंचवटीतही आहेत. म्हणूनच आज आम्ही पंचवटीतील श्रीरामाच्या दर्शनाला जात आहोत. लवकरच आम्ही अयोध्येलाही जाऊ. आज मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांना भाजपचे आदेश पाळावेच लागतील. हे सर्व मतदारांना देखील माहित आहे,' असा टोलाही त्यांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे नाशिकला; मुख्यमंत्री शिंदेंनी साधला मोठा डाव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com