Azam Khan Arrested : माजी मंत्री तुरुंगातून बाहेर येताच ईडीच्या ताब्यात, निवडणुकीच्याआधी भाजपने डाव टाकला?

Azam Khan ED BJP Politics : आपण मुस्लिम असल्याची शिक्षा आपल्याला मिळत असल्याचे आझम खान यांनी म्हटले. तुरुंगातून बाहेर येताच त्यांना ईडीने गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले.
Azam Khan
Azam KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Azam Khan News : तब्बल 11 महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झालेल्या माजी मंत्री आझम खान यांना शनिवारी संध्याकाळी ईडीने अटक केली. जौहर विद्यापीठाच्या बांधकामात सरकारी निधी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. आझाम खान हे उत्तर प्रदेशमधील बडे नेते आहे. समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

ईडी त्यांना गाझीयाबाद येथील कोर्टात सादर करणार आहे. तेथे कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. आझम खान हे समाजवादी पक्षाचे महासचिव आहे. त्यामुळे त्यांना ईडीने ताब्यात घेण्यामागे भाजपचे राजकारण असल्याची टीका करण्यात येत आहे.

आझम खान हे तुरुंगातून बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, त्यांच्यावर कारवाई होत आहे कारण ते मुस्लिम आहेत. मुस्लिम असल्यामुळे त्यांना शिक्षा मिळते आहे. त्यांनी मुस्लिम तरुणांसाठी विद्यापीठ बनवले. एका मुस्लिमाच्या मुलाने समाजासाठी विद्यापीठ बनवले, हा त्यांचा गुन्हा आहे. तसेच त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याने देखील मुस्लिम असल्याची शिक्षा आम्हाला मिळत असल्याचे म्हटले आहे.

Azam Khan
UP Assembly election 2027 : योगींचा गड भेदण्यासाठी अखिलेश यादव यांचा फॉर्म्यूला ठरला, वारं फिरणार? उत्तर प्रदेशात भाजपसमोर आव्हान, वातावरण तापलं...

अखिलेश यादवांची भाजपवर टीका

आझम यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, सत्ताधीशांना ही लक्षात ठेवावे की वेळ बदले, सत्ता बदलते. आझम खान यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा कट रचले जात आहे, हे फक्त देश नाही तर संपूर्ण जग पाहते आहे.

Azam Khan
ED Raid : स्त्रीबीज तस्करीतून कोट्यवधींची माया? ईडीचे पथक उल्हासनगरात!महिला आरोपीच्या घरात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.