UP Assembly election 2027 : योगींचा गड भेदण्यासाठी अखिलेश यादव यांचा फॉर्म्यूला ठरला, वारं फिरणार? उत्तर प्रदेशात भाजपसमोर आव्हान, वातावरण तापलं...

Akhilesh Yadav, Yogi Adityanath, Samajwadi Party, BJP Uttar Pradesh, PDA strategy : अखिलेश यादव यांनी अनेक दिवसांपासून ‘पीडीए’चे समीकरण यशस्वी पद्धतीने उभे केले असून, हा प्रयोग भाजप आणि कडवे हिंदूत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.
Yogi Adityanath, Akhilesh Yadav
Yogi Adityanath, Akhilesh YadavSarkarnama
Published on: 
Updated on: 

शरत् प्रधान

UP politics news : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा अवधी असला, तरी निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून जनतेला आपल्या बाजूकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे राजकीय डावपेच टाकण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या मागास, दलित आणि अल्पसंख्याक (पीडीए) समीकरणामुळे सत्ताधारी भाजपसमोर आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशची निवडणूक कायमच चर्चेत असते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बऱ्याच काळापासून ‘इलेक्शन मोड’मध्ये दिसत असताना, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आता रस्त्यावर उतरत प्रचाराला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस आणि गांधी कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली येथून प्रचाराचे रणशिंग फुंकले.

रायबरेलीतील मोठ्या सभेतून यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली. अखिलेश यांनी त्याबाबत खुलासा करत, समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्यातील आघाडी मजबूत करण्यासाठीच रायबरेलीत आलो असल्याचे स्पष्ट केले. अखिलेश यादव यांच्या रायबरेलीच्या सभेत मागास, दलित आणि अल्पसंख्याक (पीडीए) या समाजघटकांची मोठी उपस्थिती होती.

Yogi Adityanath, Akhilesh Yadav
Aaditya Thackeray news : ठाकरे बंधूंची 'गर्जना', पण आमदार आदित्य यांची पाठ, एकच पोस्ट अन् चर्चांना आले उधाण

अखिलेश यांनी अनेक दिवसांपासून ‘पीडीए’चे समीकरण यशस्वी पद्धतीने उभे केले असून, हा प्रयोग भाजप आणि कडवे हिंदूत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. याच सामाजिक आधाराच्या जोरावर अखिलेश आदित्यनाथ यांना आव्हान देण्याची तयारी करीत आहेत. आदित्यनाथ हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाला राजकारणातील प्रमुख मुद्दा बनवत असताना, अखिलेश यांनी बिगरयादव ओबीसी, बिगरजाटव दलित आणि मुस्लिम समाजाला पक्षाच्या आधाराशी जोडण्यावर भर दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगदी आधी दलित मतदारांचा कल समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीकडे वळविण्यात राहुल गांधी यांच्या प्रचाराचीही भूमिका राहिली. भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलली जाऊ शकते आणि त्यामुळे आरक्षणाचे धोरणही धोक्यात येऊ शकते, असा मुद्दा राहुल गांधी यांनी प्रचारात सातत्याने मांडला.

Yogi Adityanath, Akhilesh Yadav
संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

बहुजन समाज पक्षाच्या मायावती म्हणजे भाजपची ‘बी टीम’ अशी धारणा निर्माण झाल्याने पारंपरिक दलित मतदारांपैकी मोठा वर्ग त्यांच्यापासून दूर गेला, तर इंडिया आघाडीतील सहभागामुळे समाजवादी पक्ष हा अधिक सक्षम पर्याय असल्याचे मानून मुस्लिम मतदारांचा पाठिंबा अधिक दृढ झाला.

काँग्रेसच्या मर्यादा असूनही राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देणारे प्रमुख विरोधी नेते आहेत. दुसरीकडे, आदित्यनाथ यांना भाजपचा सामाजिक आधार विस्तारण्यात अडचणी येत येत आहेत. ‘सनातन धर्मा’ला धोका असल्याचा उल्लेख करताना योगी आदित्यनाथ भाषणांत ऐतिहासिक संदर्भांचा वारंवार वापर करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com