पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला पहिला झटका! पणजीत आमदारांनी थांबवला प्रचार

पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीआधी गोव्यात भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Narendra Modi and Utpal Parrikar
Narendra Modi and Utpal ParrikarSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाला पहिला हिसका दाखवला आहे. त्यांच्यामुळे पक्षाच्या विद्यमान आमदारांनी प्रचार थांबवला आहे.

पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांची प्रचार मोहीम आजपासून सुरू होणार होती. परंतु, अचानक त्यांनी ही मोहीम रद्द केली आहे. मोन्सेरात हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप पणजीतील उमेदवार जाहीर करीत नाही तोपर्यंत प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाने त्यांना आजपासून प्रचार सुरू करण्यास सांगितला होता. आता त्यांनीच पक्षाला उमेदवारी जाहीर करण्यास सांगितले आहे.

याबद्दल बोलताना बाबूश मोन्सेरात म्हणाले की, मला भाजपकडून तिकिट मिळेल की नाही, याबद्दल खात्री नाही. मला प्रचार करताना कुणी विचारले की मी कुणाच्या तिकिटारवर लढत आहे, तर मी काय उत्तर देणार आहे. हे माझ्यासाठी अपमानास्पद ठरेल. मी कुणाकडेही तिकिटाची मागणी केलेली नाही. परंतु, मला खात्री आहे की मी पणजीतून निवडणूक लढेन.

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Narendra Modi and Utpal Parrikar
तावडे 'बाजीगर' ठरले पण विजयावरील प्रश्चचिन्ह कायम!

पणजीच्या जागेवर सध्या बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा दावा सांगत आहेत. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्पल यांनी मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचीही भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com