Sheikh Hasina : शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा दणका; आता मोदी सरकार काय करणार?

Bangladesh Ex PM Arrest Warrant : बांग्लादेशातून पलायन केल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे.
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांग्लादेशातील भारतात पलायन केलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे. बांग्लादेशीतील कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता यावर मोदी सरकार काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

बांग्लादेशात हसीना यांच्या सरकारविरोधात आक्रोश वाढल्यानंतर त्यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात भारता पलायन केले होते. त्या सध्या दिल्लीजवळील लष्कराच्या एका विमानतळावर आश्रयाला असल्याचे सांगितले जाते. त्यांना अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून 18 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे.

Sheikh Hasina
Haryana Assembly Election : हरियाणात 20 मतदारसंघात पुन्हा निवडणूक? याचिका पाहून सरन्यायाधीशांनाही आश्चर्य वाटलं...

ढाक्यातील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलमध्ये हसीना आणि त्यांच्या 45 सहकाऱ्यांविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. प्रमुख याचिकाकर्ते मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी याबाबत माहिती दिली आहे. हसीना यांच्याविरोधात बांग्लादेशात यापूर्वीच फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मानवी हक्कांचे अनेकदा उल्लंघन केल्याचा ठपका कोर्टाने हसीना यांच्यावर ठेवला आहे.

राजकीय विरोधकांच्या हत्या, अनेकांना अटक करणे आदी आरोपही हसीना यांच्यावर आहेत. कोर्टाने हसीना यांच्या एका सहकाऱ्याविरोधात अटक वॉरंट जाहीर केल आहे. त्यांच्या अवामी लीग पक्षाचे माजी महासचिव ओबेदुल कादर असे त्यांचे नाव आहे. इतर 44 जणांचाही यामध्ये समावेश आहे. या सर्वांविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Sheikh Hasina
Haryana Oath Ceremony : भाजपचे ओबीसी कार्ड; मंत्रिमंडळात साधले जातीय समीकरण, किती दलितांना स्थान?

हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या जवळपास डझनभर नेत्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याआधी देशातील तरुणांची सुरू केलेल्या आंदोलनामध्ये जवळपास 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो जण जखमी झाले आहेत. हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली देशात अंतरिम सरकार अस्तित्वात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com