Haryana Assembly Election : हरियाणात 20 मतदारसंघात पुन्हा निवडणूक? याचिका पाहून सरन्यायाधीशांनाही आश्चर्य वाटलं...

Supreme Court EVM Issue Election Result : मतमोजणीदरम्यान काँग्रेसने काही मतदारसंघात ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.  
Haryana Election, Supreme Court
Haryana Election, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनी तर अन्य 13 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा शपथविधी रोखण्याची आणि राज्यातील 20 विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टात या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच शपथविधी रोखण्यासही कोर्टाने निकाल दिल्याने सैनी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी विनाअडथळा पार पडला.

Haryana Election, Supreme Court
Haryana Oath Ceremony : भाजपचे ओबीसी कार्ड; मंत्रिमंडळात साधले जातीय समीकरण, किती दलितांना स्थान?

हरियाणातील निवडणूक आलेल्या सरकारचा शपथविधी आम्ही रोखावा, असे तुम्हाला वाटते? ही कोणत्या प्रकारची याचिका आहे, असे आश्चर्य धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. तसेच तातडीने सुनावणी घेणार नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली.

याचिकेत म्हटले आहे की, याचिकेत नमूद करण्यात आलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएमची बॅटरी 99 टक्के चार्ज होती. इतर मतदारसंघातील बॅटरीचे चार्जिंग 60 ते 70 टक्के होते. त्यामध्ये ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे दिसते.

Haryana Election, Supreme Court
Akhilesh Yadav : अखिलेश यादव महाराष्ट्रात येऊन ‘एक घाव दोन तुकडे’ करणार; चेंडू ‘मविआ’च्या कोर्टात

काँग्रेसकडूनही आरोप

याचिकेत उपस्थित करण्यात आलेला बॅटरीचा मुद्दा काँग्रेसनेही उपस्थित केला होता. काँग्रेस नेत्यांनीही अनेक मतमोजणी केंद्रीतील ईव्हीएमची बॅटरी 99 टक्के होती, असा दावा नेत्यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली आहे.

दरम्यान, हरियाणाच्या निवडणुकीत भाजपने भाजपने 48 जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेसला 90 पैकी 37 जागांवरच समाधान मानावे लागले. इनलो पक्षाने दोन जागा जिंकल्या. तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com