Sakshi Malik : साक्षी मलिक यांचा मोठा गौप्यस्फोट; बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भाजपच्या महिला नेत्यानेच पेटवलं आंदोलन

Babita Phogat Brij Bhushan Singh Wrestling Federation : मागील वर्षी दिल्लीत कुस्तीपटूंनी आंदोलन करत बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते.
Sakshi Malik, Brij Bhushan Singh
Sakshi Malik, Brij Bhushan SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनवरून हटवण्यासाठी भाजपमधीलच महिला नेत्याने कुस्तीपटूंना फूस लावल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. या महिला नेत्याला भाजपमधील आणखी एका नेत्याने साथ दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

साक्षी मलिकसह नुकत्याच आमदार झालेल्या विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटूंनी काही महिन्यांपूर्वीत दिल्लीत मोठे आंदोलन केले होते. तत्कालीन भाजप खासदार व फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या आंदोलनानंतर सिंह यांना भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारले. त्याआधी त्यांना फेडरेशनमधूनही अंग काढून घेतले.

Sakshi Malik, Brij Bhushan Singh
Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला संपवा, 1,11,11,111 रुपये मिळवा; कोणी केली घोषणा?

मलिक यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना भाजप नेत्या बबिता फोगाट यांच्यावर आरोप केले आहेत. सिंह यांना हटवून बबिता यांना फेडरेशनचे अध्यक्ष व्हायचे होते. त्यासाठी सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी त्यांनी कुस्तीपटूंना फूस लावल्याचा दावा साक्षी यांनी केला आहे.

साक्षी मलिक म्हणाल्या, बबिता आमच्याकडे आल्या होत्या. सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्याबाबत त्या बोलल्या होत्या. त्यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ होता. त्यांना फेडरेशनचे अध्यक्ष व्हायचे होते. आमच्या आंदोलनाला काँग्रेसने मदत केली, या अफवा होत्या. खरंतर दोन भाजप नेत्यांनीच आम्हाला आंदोलनासाठी परवानगी मिळवून देण्यात मदत केली. ते नेते बबिता फोगाट आणि तीर्थ राणा होते.

Sakshi Malik, Brij Bhushan Singh
Arvind Kejriwal and PM Modi News : पंतप्रधान मोदींशी संबंधित प्रकरणात केजरीवालांना बसला 'सुप्रीम' झटका!

आंदोलनाची सुरूवात बबिता फोगाट यांच्या कल्पनेतून झाली असली तरी त्यांचा पूर्णपणे त्यामध्ये सहभाग नव्हता. फेडरेशनमध्ये लैंगिक छळाची, अत्याचाराबाबतचे गंभीर मुद्दे असल्याचे आम्हाला माहिती होते. आम्हाला वाटले की, बबिता फोगाटसारखी महिला प्रमुख असेल तर अशा घटना थांबतील. आमच्या भावना त्या समजून घेतील, असे आम्हाला वाटले. पण बबिता आमच्यासोबत अशा खेळ खेळतील, असे वाटले नव्हते. त्या आमच्यासोबत आंदोलनाला बसतील, असे वाटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com